Viral Video: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील त्याच्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. माणूस वयाने कितीही लहान असला किंवा मोठा असला तरी त्याला नेहमीच त्याच्या आईच्या सहवासाची आणि प्रेमाची ओढ असते. आई-वडिलांकडून मिळालेले प्रेम, शिकवण लहानपणापासूनच मुलांच्या आयुष्यावर प्रभाव टाकते. अनेकदा हे सुख प्रत्येकाच्या वाट्याला दीर्घकाळासाठी येत नाही; परंतु आता AI च्या मदतीने अनेक गोष्टी सहन शक्य झाल्या आहेत. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका आई-मुलाच्या फोटोद्वारे AI चा वापर करून, एक सुंदर व्हिडीओ बनवण्यात आलाय. त्यात आई तिच्या मुलाला मिठी मारताना दिसत आहे.

आपल्या दैनंदिन जीवनातला AI चा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रत्येक जण त्यांच्या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी एआय (AI)ची मदत घेताना दिसत आहे. पर्सनलसह प्रोफेशन आयुष्यतही AI चा उपयोग केला जाऊ लागला आहे. सोशल मीडियावर AI च्या मदतीने अनेक फोटो, व्हिडीओ बनवले जातात, ज्यामुळे अनेकांना त्यांच्या आयुष्यातील हरवलेले सुख अनुभवता येते.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका आई आणि मुलाच्या जुन्या फोटोद्वारे AI च्या मदतीने एक व्हिडीओ बनवण्यात आला आहे. त्यात आई आणि तिचा मुलगा अनेक वर्षांनंतर एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. हा व्हिडीओ शेअर केलेल्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये, ‘तरुणपणातले माझे वडील आणि त्यांची स्वर्गवासी आई यांची AI ने झालेली भेट’, असे लिहिले आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shivkumardeore या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओवर आतापर्यंत पाच लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “खतरनाक व्हिडीओ”. तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “मलापण करायचा आहे असा व्हिडीओ”. आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “आईला मिठी मारण्याचं राहून गेलेलं स्वप्न या फोटोमध्ये पूर्ण झालं”. आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “अशी मिठी माझ्या बापाला मारायची आहे”. तसेच अनेक युजर्स किली पॉलचे कौतुक करताना दिसत आहेत.