Elephant Viral Video: समाजमाध्यमांवर व्हायरल झालेले विविध व्हिडीओ आपण नेहमीच पाहतो; ज्यात बऱ्याचदा लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांबरोबरचे व्हिडीओदेखील शेअर करीत असतात. या व्हिडीओंमध्ये अनेकदा लोक आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांबरोबर खेळताना, तर कधी मजामस्ती, तर कधी भांडण करतानाही दिसतात. पाळीव प्राण्यांबरोबरची मजामस्ती पाहणं नॉर्मल गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक तरुणी चक्क वाघाबरोबर खेळताना दिसली होती. दरम्यान, अशाच प्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एका हत्तीचं पिल्लू एका व्यक्तीबरोबर असं काहीतरी करतं, जे पाहून युजर्सही अवाक् झाले आहेत.
जंगलातील प्राण्यांपैकी हत्ती हा एक असा प्राणी आहे की, जो खूप शांत, संयमी आहे. हत्ती सहजा कोणावर हल्ला करीत नाही. पण, जेव्हा त्याला राग येतो त्यावेळी त्याच्यासमोरच्या प्राण्याला किंवा व्यक्तीला वाचवणं खूप कठीण होऊन जातं. तसेच बऱ्याचदा तो एखाद्यावर जीवही लावताना दिसतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काही पाहायला मिळत आहे.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Elephant Viral Video)
हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून, काही पर्यटक जंगल सफारीसाठी गेल्याचे दिसत आहे. यावेळी हत्तीचं एक पिल्लू एका व्यक्तीसोबत खेळताना दिसत आहे. पुढे खेळता खेळता हत्तीच्या त्या पिल्लाला त्या व्यक्तीचा लळा लागतो. त्यामुळे लाडात येऊन ते पिल्लू त्या व्यक्तीला सोंडेनं कुरवाळतं, त्या व्यक्तीचं चुंबन घेतं आणि त्याच्या कुशीत झोपण्याचा प्रयत्न करतं. हत्तीची ही कृती पाहून आसपास उभे असलेले लोक मोठमोठ्याने हसू लागतात.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @elephants._.love अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि ४० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “हत्ती खूप निरागस प्राणी आहे.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “सांभाळून नाही तर तो तुला खाईल.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “यांचं बॉण्डिंग भारी आहे.” इतर युजर्सही हा व्हिडीओ पाहून ते खूप घाबरले, असं सांगत आहेत.
दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामध्ये एक तरुणी वाघाबरोबर खेळताना दिसली होती. दुसऱ्या व्हिडीओमध्ये एक तरुण चक्क बिबट्याबरोबर सेल्फी घेताना दिसला होता.