Viral Video: वडील आपल्या मुलांना जीवापाड जपतात. प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून, ते मुलांचा जीव वाचवतात. त्यामुळे प्रत्येकासाठी आपले वडील हीरो असतात. मुलांवर योग्य संस्कार करणं, त्यांना चांगल्या-वाईट गोष्टी समजावून सांगणं, मुलांचे लाड करणं किंवा त्यांच्यावर रागावणं हे सर्व वडीलच करू शकतात. मुलांवर आलेलं संकट स्वतःवर घेऊन, त्यांचं रक्षण कसं करायचं हे फक्त त्यांनाच ठाऊक असतं. आता अशीच एक घटना दाखविणारा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल.

श्वान हा अनेकांचा आवडता प्राणी आहे, त्याला त्याच्या प्रामाणिकपणासाठी ओळखलं जातं. अनेकदा काही श्वान संकटात अडकलेल्या व्यक्तींची मदत करताना दिसतात. तुम्ही व्हायरल झालेले या संदर्भातील अनेक व्हिडीओही पाहिले असतील. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक श्वान चिमुकल्यावर हल्ला करण्यासाठी आल्याचं दिसतंय; परंतु यावेळी असं काहीतरी घडतं, जे पाहून तुम्ही शॉक व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका दुकानामध्ये एक वडील आपल्या लहान बाळाला घेऊन झोपले आहेत. त्यावेळी दुकानात एक श्वान येतो. तो बाळाला पाहतो आणि बाळावर हल्ला करण्यासाठी पुढे येतो. इतक्यात बाळाचे वडील सावध होतात आणि श्वानाला हातात घेऊन, दोन-तीन वेळा जमिनीवर आपटतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @official_ramesh87 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकानं लिहिलंय, “शेवटी बाप बाप असतो”. दुसऱ्यानं लिहिलंय, “पण त्याला मारायची काय गरज होती?” तिसऱ्यानं लिहिलंय, “बापाचं प्रेम”.

Story img Loader