Viral Video: अन्न, वस्त्र व निवारा या प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत गरजा आहेत. श्रीमंत असो किंवा गरीब; प्रत्येकाची दोन वेळचं पोटभर अन्न मिळणं ही मुख्य गरज आहे. त्यासाठी प्रत्येक जण कष्ट करत असतो. पण, कधीतरी जेवण बनवण्याला आराम मिळावा म्हणून अनेक जण आवडीनं बाहेरून काही पदार्थ पार्सल घेऊन जातात आणि मग तेच जेवण ते खूप आवडीनं ताव मारून खातात. खरं तर, अन्नाला पूर्णब्रह्म म्हटलं जातं आणि त्यामुळे त्याचा अपमान करणं योग्य नाही. परंतु, बाहेर विकत मिळणारं अन्न कितीही चविष्ट असलं तरी घरचं अन्न बनवताना वापरली जाणारी स्वच्छता कुठेही पाहायला मिळत नाही. आजपर्यंत तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यात बाहेर विकत मिळणारे पदार्थ बनविताना विक्रेत्यांचा निष्काळजीपणा दिसून येतो. आता याहून अधिक घाणेरडे कृत्य करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरी संताप व्यक्त करीत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका हॉटेलमधील अन्नपदार्थ बनविणारा मनुष्य एका पिशवीमध्ये पार्सल पॅक करीत आहे. यावेळी तो त्या पिशवीमध्ये चक्क थुंकतो आणि नंतर त्यात पदार्थ पॅक करतो. त्याचं हे किसळवाणं कृत्य एक व्यक्ती त्याच्या नकळत कॅमेऱ्यात कैद करते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्हीदेखील पार्सल अन्न आणताना १० वेळा विचार कराल. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @parivartan_news या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास दोन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. त्याशिवाय त्यावर अनेक युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरनं लिहिलंय, “यात याची चूक नाही. नागरिकांनी याबाबत जागरूक राहिलं पाहिजे. काही लोक जे बॅचरल आहेत, ते भूक लागली की कुठेही जेवण करतात, त्यांनीही स्वतः काळजी घेतली पाहिजे”. तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “हा व्हिडीओ बनविण्याआधी या माणसानंच त्याला मारायला पाहिजे होतं”. तिसऱ्या व्यक्तीनं लिहिलंय, “व्हिडीओ दाखविण्यापेक्षा पहिलं त्याचं तोंड फोडा”. आणखी एकानं लिहिलंय, “किळसवाणा प्रकार”.