Viral Video: हल्लीची लहान मुलं खूप ॲडव्हान्स झाली आहेत, कारण त्यांना बालपणापासूनच आपल्या आवडी-निवडी, कला, छंद कोणते हे कळतं आणि त्यानुसार ते आपली आवड जोपासायला सुरुवात करतात, त्यामुळे भविष्यात आपल्याला काय करायचं याबाबत त्यांचे निर्णय ते स्वतः घेतात. दरम्यान, यात अनेकांना डान्स करणे, गाणं गाणे, अभिनय करणे या गोष्टी करायला खूप आवडतात. सोशल मीडियावरही रील्सच्या माध्यमातून ते आपली आवड जोपासताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात दोन लहान मुली जबरदस्त डान्स सादर करताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दररोज सोशल मीडियावर अनेक चांगल्या-वाईट घटनांचे व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात, ज्यातील काही व्हिडीओ निरर्थक विषयांवर आधारित असतात. पण, अनेक युजर्स असेही असतात जे सोशल मीडियावर उत्तम दर्जाचे कंटेंट शेअर करतात. ज्यात सुंदर डान्स, संगीत, रेसिपी, लेखन अशा विविध गोष्टी आपल्याला पाहायला किंवा वाचायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन लहान मुली ‘तू रमता जोगी’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. यावेळी दोघींच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्स पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. सध्या या दोघींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: “जगण्यासाठी रोज नवा संघर्ष…” भुकेने व्याकूळ झालेल्या चित्त्याने हरणावर हल्ला करण्यासाठी लढवली युक्ती; चित्तथरारक Video एकदा पाहाच

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @barkat.arora या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास पस्तीस मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि दोन मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “आईशप्पथ… काय नाचल्या या दोघी”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “दोघींचे एक्स्प्रेशन्स जबरदस्त आहेत.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “कमाल डान्स करतायत”, तर आणखी अनेक युजर्स दोघींचे कौतुक करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video the girls did a great dance on the song tu ramta jogi you will also appreciate watching the video sap