Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांचे विविध व्हायरल व्हिडीओ नजरेस पडतात, ज्यात बऱ्याचदा प्राण्यांमध्ये मैत्री झालेली दिसून येते तर कधी प्राणी एकमेकांसोबत पंगा घेताना दिसतात. बऱ्याचदा प्राण्यांचे भांडण पाहून आपल्याही अंगावर काटा येतो. हे व्हिडीओ क्षणार्धात खूप व्हायरल होतात अन् लाखो व्ह्यूजही मिळवतात. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. त्या म्हणीच्या अर्थाप्रमाणेच काही लोक दिसायला लहान असतात, पण त्यांचे काम खूप मोठे असते. ही म्हण अनेकदा आपण काही व्यक्तींना उद्देशून म्हणतो. पण, आता व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिल्यावर ही म्हण या व्हिडीओतील बकरीसाठी लागू होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत असून, अनेक जण त्यावर विविध कमेंट्स करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक बकरी एका बैलासोबत पंगा घेताना दिसतेय. हा बैल जवळपास त्या बकरीपेक्षा चौपट असूनही बकरी त्याला न घाबरता नडत आहे. हे दोघेही एकमेकांना आपल्या शिंगांनी टक्कर देताना दिसत आहेत. बैल बकरीला मारण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहे, पण बकरी मात्र तिथून पळून न जाता त्याला जबरदस्त खुन्नस देतेय. पुढे काही वेळाने बैल स्वतः मागे जातो, पण बकरी त्यालाच मागे ढकलताना दिसत आहे. बकरीला वैतागून बैल तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो, पण बकरी पुन्हा त्याच्या मागे जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने, आयुष्यात फक्त इतका आत्मविश्वास हवा असे कॅप्शन व्हिडीओला शेअर करत लिहिलं आहे.

हा व्हिडीओ इन्स्टग्रामवरील @motivation_bond या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून पंधरा हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय या व्हिडीओवर अनेक जण कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

हेही वाचा: क्या बिबट्या बनेगा रे तू! कुत्र्याला पाहूनही बिबट्या जागचा हलेना, आळशी बिबट्याचा VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हा जरा मंद…”

पाहा व्हिडीओ:

एकाने कमेंटमध्ये लिहिलंय की, “बकरी जरी लहान असली तरी तिची समोरच्याला मारायची ताकद आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “स्वस्तातली दारू प्यायल्याने असं करत असेल.” तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “खरा योद्धा”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, आत्मविश्वास जरा जास्तच आहे.”

दरम्यान, असाच एक व्हिडीओ याआधीदेखील व्हायरल झाला होता, ज्यामध्ये गेंड्याचे लहान पिल्लू एका वाइल्डबिस्ट प्राण्याला विनाकारण खुन्नस देताना दिसले होते. यावेळीदेखील वाइल्डबिस्ट त्या गेंड्याच्या पिल्लाला घाबरून पळून गेला होता.