Viral Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर; तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. त्याशिवाय हे व्हिडीओ प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे असतात, ज्यामुळे युजर्सही मोठ्या आवडीने या व्हिडीओंना पसंती देतात. सध्या एका आजीचा असाच एक मजेशीर व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे, जो पाहून तुमचेही मनोरंजन होईल.
घरामध्ये एखादी तरुण मुलगी असली की, सगळे जण तिच्या लग्नाच्या मागे लागतात. मुलगा कसा हवा, त्याला पगार किती हवा, घर कसं हवं, असे अनेक सल्ले घरच्यांकडून मुलीला दिले जात असतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील आजी तिच्या नातीलाही असाच एक सल्ला देताना दिसतेय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हीही पाहू शकता की, एक आजी तिच्या नातीला सांगते, “नवरा गोरापान पाहिजे, चांगली नोकरी पाहिजे, त्याच्याकडे बंगला, गाडी पाहिजे.” त्यानंतर तरुणी म्हणते, “आपल्याकडे आहे का तेवढं?” त्यावर आजी म्हणते, “नसलं तरी बघायला लावायचं बापाला.” त्यावर ती तरुणी म्हणते, “त्या मुलाला मी आवडायला पाहिजे ना?” मग आजी म्हणते, “काय झालं न आवडायला चांगली गोरीपान आहेस की.” त्यानंतर तरुणी म्हणते, “जर मला दारूडा नवरा भेटला आणि रोज मला मारायला लागल्यावर काय करायचं, आजकाल कोण सहन करून नाही घेत.” त्यावर आजी म्हणते, “मग तूपण हानायचं त्याला.” आजी आणि नातीचं हे विनोदी संभाषण ऐकून नेटकरी अनेक कमेंट्स करीत आहेत.
पाहा व्हिडीओ:
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, तो इन्स्टाग्रामवरील @marathmoli_mulgi या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत दोन दशलक्षांहून अधिक व्ह्युज ४० हजारांहून अधिक लाइक्सदेखील मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करीत आहेत.
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय, “मला अशी आजी पाहिजे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “नवरा नाही; कामगार पाहिजे तुम्हाला.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “आजकाल आपण भिकारी असलो तरी पोरग पैसेवाला पाहिजे. अंथरूण बघून हात-पाय पसरावे माणसाने.”