Groom Got Angry Wedding Video Viral: लग्नात अनेकदा आपण पाहिलं असेल की जेव्हा लग्नात आलेले पाहूणे मंडळी नवरा नवरीला भेटायला जातात तेव्हा प्रेमाने अनेकजण नवरा नवरीचे गाल ओढतात. काही जण त्यांची टिंगलही करतात. अनेक नवरी नवरदेव गमतीची गोष्ट म्हणून त्या गोष्टीचा आनंदही घेतात. अनेक लग्न विधीदरम्यान नवरा-नवरीसोबत थट्टा मस्करी करून लग्नाचा माहौर आणखी रंगवतात. पण हे प्रत्येक वेळी घडेलच असं नाही. काही नवरा नवरी असेही असतात की लग्नात त्यांच्यासोबत केलेली थट्टा मस्करी त्यांच्या पचनी पडत नाही आणि मग पुढे जे घडतं ते तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. असाच किस्सा घडल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही हे मात्र नक्की. या व्हिडीओमध्ये नवरा मुलगा चांगलाच भडकल्याचे दिसतेय. तो समोरच्या व्यक्तीला थेट मारायला उठला आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवऱ्या मुलाची फजिती झाली आहे. या व्हिडीओमध्ये मित्रांनी गंमत केल्यामुळे नवरा मुलगा चांगलाच भडकला आहे. नवरा मुलगा एवढा भडकला आहे की तो नातेवाईकांचं सुद्धा ऐकत नाहीये. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, निकाहच्या संबंधित सर्व विधी आटोपून नवरदेवाला जेवणाच्या टेबलावर बसवलं जातं. पण तेवढ्यात अचानक एक मित्र तिथे पोहोचतो आणि नवरदेवाची चेष्टा करायला लागतो. खरं तर मुलं तिथे नवरदेवाला केक खाऊ घालण्यासाठी येतात. पण नवरदेवाने तोंड उघडताच मुलाने केकचा तुकडा मागे घेतला. हे एकदा नव्हे दोनदा केलं. मग नवरदेवाचा पारा चढतो आणि तो जागेवरून उभा राहतो. त्या मित्राकडे तो रागात पाहू लागतो आणि थोड्याच वेळात भांडू लागतो. नवरदेवाचं असं रौद्र रूप पाहून लग्नात उपस्थित असलेले सारेच जण घाबरून जातात. त्याचा राग शांत करण्यासाठी सगळे त्याच्या अवतीभवती जमा होतात.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
a husband expressing love for his wife in front of family
असा नवरा भेटायला नशीब लागतं! कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम, पाहा Viral Video
Guy went to marry for the second time without getting divorced first wife creates ruckus in marriage hall video goes viral
नवऱ्याचं लफडं बायकोनं पकडलं! दुसरं लग्न करताना अचानक समोर आली अन्; खतरनाक VIDEO व्हायरल
a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Child recreated the scene from the Kantara movie
काय चूक होती त्याची? ‘कांतारा‘ सिनेमा पाहून जोरात ओरडला अन् आईने धोपटला; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून

आणखी वाचा : सत्तेची ‘नशा’! किरकोळ गोष्टीवरून मुख्यमंत्र्यांच्या मुलीने डॉक्टरला मारली चपराक, CM नी मागितली माफी

सारेच जण नवरदेवाला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण नवरदेव इतका खवळला होता की त्याने टेबलवर ठेवलेला केकच फेकून दिला. नवरदेव तर त्या मित्राला मारण्यासाठी निघाला होता. पण खवळलेला नवरदेव पाहून मुलाने वेळीच स्वतःला आवरलं आणि एका कोपऱ्यात शांत उभा राहिला. त्यामुळे नवरदेवही काहीसा शांत झाला.

आणखी वाचा : ‘आ भैंस मुझे मार..’! म्हशीसमोर मुलगी नाचू लागली, मग पुढे काय घडतं ते पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : सांगा प्राणी कोण? बिबट्याची शेपूट आणि पाय ओढून खेचत होता, लोक VIDEO बनवत राहिले…

हा मजेदार व्हिडीओ ghantaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. हा व्हिडीओ बघता बघता इतका व्हायरल झाला की आतापर्यंत त्याला ४ लाख ३९ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि १६ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसून येत आहेत.

Story img Loader