Groom Got Angry Wedding Video Viral: लग्नात अनेकदा आपण पाहिलं असेल की जेव्हा लग्नात आलेले पाहूणे मंडळी नवरा नवरीला भेटायला जातात तेव्हा प्रेमाने अनेकजण नवरा नवरीचे गाल ओढतात. काही जण त्यांची टिंगलही करतात. अनेक नवरी नवरदेव गमतीची गोष्ट म्हणून त्या गोष्टीचा आनंदही घेतात. अनेक लग्न विधीदरम्यान नवरा-नवरीसोबत थट्टा मस्करी करून लग्नाचा माहौर आणखी रंगवतात. पण हे प्रत्येक वेळी घडेलच असं नाही. काही नवरा नवरी असेही असतात की लग्नात त्यांच्यासोबत केलेली थट्टा मस्करी त्यांच्या पचनी पडत नाही आणि मग पुढे जे घडतं ते तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. असाच किस्सा घडल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही हे मात्र नक्की. या व्हिडीओमध्ये नवरा मुलगा चांगलाच भडकल्याचे दिसतेय. तो समोरच्या व्यक्तीला थेट मारायला उठला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा