Viral Video: लग्न म्हणजे फक्त दोन मनंच नाही तर दोन कुटुंबंदेखील जोडली जातात. लग्नाच्या वयात येताच तरुण-तरुणी आपल्या लग्नाचे स्वप्न पाहतात. आपला जोडीदार कसा असावा अशा विविध कल्पना करतात. पण, हल्ली लग्नासाठी अनेक तरुण-तरुणींना आपल्या मनासारखा जोडीदारच मिळत नाही, त्यामुळे लग्न खूप उशिरा होतात. पण, याच परिस्थितीला कंटाळलेल्या एका तरुणाने असं काहीतरी केलंय जे पाहून तुम्हीही कपाळावर हात मारून घ्याल.

सोशल मीडियावर लग्नसमारंभाचे अनेक व्हायरल व्हिडीओ आपण पाहतो. ज्यात लग्नाचे अनेक मजेशीर किस्से, फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा त्यात लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक कधीही न पाहिलेला व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
Marathi actress Pooja Sawant started preparations to celebrate the first Makar Sankranti after marriage
Video: लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत साजरी करण्यासाठी पूजा सावंत लागली तयारीला, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “वेध…”
Groom dance with mother in his haldi on khandeshi song video goes viral on social media
“आये कर मन लगन” नवरदेवानं बायकोसोबत नाहीतर आईसोबत धरला खानदेशी ठेका; VIDEO झाला व्हायरल
Emotional video of grandfather during granddaughter wedding video viral on social media
“लग्नात सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पण…”, नात आणि आजोबांचा ‘हा’ VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Bride groom video husband picked up his wife while gruhpravesh after wedding newly weds couple video viral on social media
असा गृहप्रवेश प्रत्येक मुलीचा असावा! नवरदेवाने बायकोला चक्क उचलून घेतलं अन्…, लग्न करणाऱ्या मुलांनी ‘हा’ VIDEO एकदा बघाच
Kshiti Jog Birthday hemant dhome special post
“पाटलीणबाई आज तुमचा जन्म…”, क्षिती जोगच्या वाढदिवशी हेमंत ढोमेची खास पोस्ट! बायकोला शुभेच्छा देत म्हणाला…

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नमंडपातील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, एक नवरदेव लग्नासाठी मंडपात बसला असून तो लग्न विधीसाठी बसलेला दिसत आहे. पण, यावेळी त्याच्या बाजूला वधू नसून वधूच्या वेशात चक्क बाहुली बसलेली दिसत आहे. यावेळी तो नवरदेव चक्क बाहुलीबरोबर लग्न करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लास्ट ऑप्शन असे लिहिलेले आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून हा @MEMES KING या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला आतापर्यंत एक हजारांहून अधिक व्ह्यूज आणि काही लाइक्स मिळाल्या आहेत.

हेही वाचा: ‘आई-बापाची तरी पर्वा कर…’ चालत्या ट्रकखाली तरुण करतोय स्केटिंग; प्रसिद्धीसाठी जीवघेणा स्टंट VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने लिहिलंय की, “अरे देवा आता हे काय नवीन”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “सरकारी नोकरी पाहिजे”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “खरंच हा लास्ट ऑप्शन आहे”, तर चौथ्या युजरने लिहिलंय की, “आम्ही सिंगलच बरे आहोत.”

दरम्यान, यापूर्वीही सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मागील काही वर्षांपूर्वी गुजरातमधील एका तरुणीने चक्क स्वतःशी लग्न केले होते.

Story img Loader