Viral Video: जंगलातील व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. सोशल मीडियावर जंगलातील प्राण्यांचे नवनवीन व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असतात. ज्यात कधी एखादा हिंस्र प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करताना दिसतो, तर कधी कधी प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल होऊन लाइक्स मिळवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात तरस प्राण्यांचा समूह एका सिंहावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण, पुढे असं काहीतरी होतं जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

तरस जंगलातील असा प्राणी आहे, जो बऱ्याचदा समूहामध्ये राहतो आणि शिकारही समूहानेच करतो. सिंह, बिबट्या, वाघ यांसारखे हिंस्र प्राणीदेखील तरस प्राण्याला खूप घाबरतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे. तरस प्राण्यांचा समूह विनाकारण सिंहाला त्रास देत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलामध्ये सिंह झुडपामध्ये शांत उभा असून यावेळी तरसांचा समूह तिथे येतो आणि सिंहाला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्यातील दोन-तीन तरस सिंहाच्या मागे उभे राहतात आणि त्याच्या शेपटीला त्रास देतात. यावेळी सिंह तरसांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे तरस पुन्हा सिंहाच्या मागे उभे राहतात आणि त्याची शेपूट तोंडात घेऊन जोरात ओढतात. यावर सिंह त्यांच्या अंगावर धावून येण्याचं नाटक करून त्यांना दूर करतो.पण, सिंहाची ही मस्करी या प्राण्यांना महागात पडू शकते. सिंह आपला संयम सोडून कधी त्यांच्यावर हल्ला करेल हे सांगू शकत नाही. तरस आणि सिंहाच्या या गमतीशीर व्हिडीओवर अनेक जण कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘लेकरू कोणाचंही असो, जीव लावणं महत्त्वाचं…’ पडणाऱ्या चिमुकल्याला श्वानाने वाचवलं; VIDEO पाहून कराल कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ यूट्यूबवरील @Latestsightings या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाल्या आहेत, तसेच सात लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय, “मला हे पाहून खूप हसू आलं”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “हा प्राणी इतर प्राण्यांसाठी खूप त्रासदायक आहे”, तर तिसऱ्याने लिहिलेय, “सिंहाची मस्करी करणं सोपी गोष्ट नाही.”