Viral Video: दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वेत अनेक प्रकारचे कोच असतात. जनरल आणि स्लीपर कोच यापैकी एकाचे तिकीट काढून किंवा बुक करून प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करता येतो. पण, बऱ्याचदा ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेक प्रवाशांमध्ये जोरदार भांडण होते. काही वेळा शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीपर्यंत होताना दिसते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओत सामान ठेवण्यावरून दोन प्रवाशांमध्ये जोरदार भांडण झाल्याचे दिसून आले आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दोन रेल्वे प्रवाशांमध्ये जोरदार वाद झाला. दोन प्रवासी ट्रेनमध्ये सामान ठेवण्याच्या जागेवरून एकमेकांशी वाद घालताना दिसले. प्रकरण असे आहे की, एक प्रवासी मद्यपान केलेल्या अवस्थेत प्रवास करीत असतो. दरम्यान, त्या मद्यधुंद व्यक्तीला आपल्या कुटुंबाबरोबर प्रवास करणारा प्रवासी त्यांच्या येथे सीटवर बसण्यास नकार देतो आणि तुझं सामान येथून घेऊन जा, नाही तर खिडकीबाहेर फेकून देईन, असे सांगताना दिसतो आहे. एकदा पाहाच हा व्हिडीओ.
हेही वाचा…बेशिस्त रिक्षा चालकांची दादागिरी! अज्ञात व्यक्तीच्या गाडीची फोडली काच अन्… पाहा थरारक VIDEO
व्हिडीओ नक्की बघा :
व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, सामान ठेवण्यास विरोध केल्यावर मद्यधुंद अवस्थेतील व्यक्ती विरोध करण्यास सुरुवात करते. लहान मुलं आणि स्त्रिया बसलेल्या असताना येथे बसणं बरोबर नाही, असे दुसरा प्रवासी वारंवार सांगत असतो. पण, मद्यधुंद अवस्थेतील व्यक्ती स्वतःचे सामान घेऊन जाण्यास व दुसरीकडे बसण्यास नकार देते. त्यामुळे वाद अजून टोकाला जातो आणि जोरदार भांडण होते.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Crabbed_monk या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. भांडणादरम्यान आजूबाजूचे लोक वाद थांबविण्याचा फारसा प्रयत्न न करता, भांडणाचे साक्षीदार होताना दिसले आहेत. तसेच हा व्हिडीओ पाहून रेल्वेनेसुद्धा दखल घेतली आहे आणि तत्काळ प्रतिक्रिया देत लिहिले, “कृपया तुमचा PNR नंबर आणि मोबाईल नंबर शक्यतो डायरेक्ट मेसेज (DM)द्वारे शेअर करा; जेणेकरून आम्हाला त्वरित कारवाई करता येईल. किंवा थेट railmadad.indianrailways.gov.in वर तुमची चिंता मांडू शकता किंवा जलद संपर्क साधण्यासाठी १३९ डायल करू शकता.”