Viral Video: भारतात दिवाळीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी संपली असली तरीही अजूनही लोकांमधील दिवाळीचा उत्साह कमी झालेला नाही. फटाक्यांची आतषबाजी, सुंदर लायटिंग अजून पाहायला मिळत आहे. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहेत. त्यात कधी कोण फटाके फोडताना अनोखे स्टंट करताना दिसत आहे. तर कधी कोण असं काहीतरी करीत आहे, जे पाहून तुम्हालाही हसू येईल. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात चक्क श्वानाबरोबर असं काहीतरी करण्यात आलं आहे, जे पाहून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल.
खरं तर श्वान हा अनेकांचा लाडका प्राणी आहे. या पाळीव प्राण्यावर लोकांचं जीवापाड प्रेम असतं. कुत्र्याला घरातील सदस्याएवढीच उत्तम वागणूक दिली जाते. त्याशिवाय त्याची आवड-निवडही पूर्ण केली जाते. अलीकडे अनेक जण कुत्र्याचा वाढदिवसदेखील आवडीनं साजरा करतात, त्याला फिरायला घेऊन जातात. अशा अनेक कौतुक सोहळ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. त्याशिवाय कित्येकांच्या घरांतील या लाडक्या प्राण्याचे अनेक मजेशीर व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर खूप व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही हसू येईल.
काय घडंल व्हिडीओमध्ये?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका सोसायटीबाहेर एक श्वान फिरत असून, त्याच्या अंगाला चक्क लायटिंगनं वेढून टाकलंय. ही लायटिंग पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीनं त्यावर डॉगकडून तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा, असं लिहिलेलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात खूप व्हायरल होत आहे.
हेही वाचा: किली पॉलचा ‘तेरा घाटा’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @amitsahu_07may या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहो. आतापर्यंत त्यावर जवळपास तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि २० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “बापरे, आता हे काय नवीन.” आणखी एका युजरनं लिहिलंय, “एकदम कडक काम.” आणखी एकानं लिहिलंय, “मुक्या प्राण्यांना असा त्रास नका देऊ.” तर, अनेक जण या व्हिडीओवर हसताना दिसत आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd