Viral Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत असतात. अनेकदा असे व्हिडीओ आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे असतात. विशेषत: यात प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडीओ असतात, अशा व्हिडीओंना पाहण्यासाठी नेटकरीही नेहमीच तयार असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सिंहाने बिबट्यावर केलेल्या हल्ल्याचा आहे. पण, नंतर पुढे असं काही होतं जे पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
वाघ, बिबट्या, सिंह किंवा चित्ता हे जंगलातील हिंस्र प्राणी नेहमीच इतर प्राण्यांची शिकार करतात. प्राण्यांची शिकार करण्यासाठी या हिंस्र प्राण्यांना अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यांच्या शिकारीचे आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण, कधी तुम्ही एखादा सिंह, वाघावर किंवा बिबट्यावर हल्ला करत असल्याचे पाहिलं आहे का? असे व्हिडीओ क्वचित आपल्याला पाहायला मिळतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक सिंह बिबट्यावर हल्ला करत असल्याचे दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एका जंगलामध्ये बिबट्याला पाहून सिंह त्याच्यावर हल्ला करण्यासाठी जातो. यावेळी तो बिबट्याला खाण्यासाठी अनेक प्रयत्न करतो, पण यावेळी बिबट्यादेखील अजिबात हार मानत नाही. तोदेखील सिंहाला तितक्याच ताकदीने पळवून लावण्याचा प्रयत्न करतो. शेवटी बिबट्याच्या प्रयत्नांना यश मिळते आणि तो दूर पळून जातो.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sharnuud_anirkhan या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्युज आणि ४० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
या व्हिडीओवर कमेंट करीत एका युजरनं लिहिलंय, “बिबट्या आणि सिंह एकाच साईजचे आहेत, तरीही त्यांच्या ताकदीत फरक आहे.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “बिबट्यादेखील चांगला फायटर आहे.” आणखी एकानं लिहिलंय, “असं भांडण मी पहिल्यांदाच पाहिलं.” आणखी एकानं लिहिलंय, “बिबट्या सिंहापेक्षा चपळ आणि हुशार आहे.”