Viral Video: सोशल मीडियावर आपण घरबसल्या संपूर्ण जगभरातील विविध गोष्टींबद्दलची माहिती काही क्षणांत मिळवू शकतो. दिवसेंदिवस लोकांच्या दैनंदिन आयुष्यात सोशल मीडियाचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या सोशल मीडिया हा अनेकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. बरेच लोक सोशल मीडियाचा वापर स्वतःचे व्लॉग, व्हिडीओ शेअर करून प्रसिद्धी, पैसे कमावतात; हल्ली लहान मुलंही लहानपणापासूनच सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. खरं तर, लहान मुलांना या वयात मोबाईल, सोशल मीडिया या सर्व गोष्टींपासून दूर ठेवायला हवं. पण, अनेकदा मुलं त्रास देतात म्हणून पालकच मुलांच्या हातात मोबाईल देऊन बाजूला होतात. हळूहळू मुलांना मोबाईलचं व्यसन लागतं. दरम्यान, आता एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एक लहान मुलगा मोबाईलवरून त्याच्या आईला ओरडताना दिसतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडे अनेक व्लॉगर महिला आपले व्लॉग त्यांच्या मुलांनाही दाखवतात. त्यांच्याबद्दलची माहिती देतात. या सगळ्याची सवय हळूहळू त्या मुलांनाही होते. पण, अशी खूप कमी मुलं आहेत, ज्यांना सतत या गोष्टी दाखवलेले आवडत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील एक लहान मुलगा असंच काही बोलताना दिसतोय, जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका हॉटेलमध्ये एक कुटुंब जेवायला गेले आहे. त्यावेळी त्या लहान मुलाची आई व्हिडीओमध्ये सांगते की, बघा आज अथांग स्वतःच्या हाताने जेवत आहे. यावेळी तो मुलगा तिला म्हणतो, “बंद कर. व्हिडीओ बंद कर…” असं बोलतो. त्यानंतर त्याची आई व्हिडीओ बंद करते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘नाद पाहिजे ओ…’ भरमंडपात हातात वीणा घेऊन त्याने ठेका धरला… छोट्या वारकऱ्याचा VIDEO पाहून म्हणाल “शेवटी संस्कार महत्त्वाचे”

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dramatic_me_trush या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत दोन दशलक्षांहून अधिक व्ह्युज मिळाले असून, त्यावर ४० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर एका युजरने लिहिलेय, “त्याचं वय तीन वर्षं आहे; पण तो वागतोय ६० वर्ष असल्यासारखा.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल ‘रांगडा’ दरारा.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “ते सर्व सोडा, छोट्याची hairstyle लय danger आहे.” आणखी एकाने लिहिलेय, “गुड बॉय.”