Viral Video: लहान मुलं कितीही निरागस असली तरीही ती कधी काय करामत करतील हे कोणीही सांगू शकत नाही. अनेकदा ते आई-वडिलांच्या नकळत अशा काही गोष्टी करतात की, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त होते. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एका चिमुकल्याने चक्क हातामध्ये साप पकडल्याचे दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. सोशल मीडियावरील ट्रेंड सतत विविध गोष्टींमुळे बदलत असतो. कधी थरकाप उडवणारे व्हिडीओ, तर कधी आपले मनोरंजन करणारे व्हिडीओ सातत्याने आपल्या डोळ्यांसमोर येतात. बऱ्याचदा यावर असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यात नकळत घडलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एका चिमुकल्याचा असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात त्याने आपल्या बाबांबरोबर असं काहीतरी केलंय, जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका नदीच्या किनाऱ्यावर एक चिमुकला फिरत असून वाटेत त्याला साप दिसतो. पण, तो सापाला रशी समजून हातात उचलतो आणि नदीकिनाऱ्यावर मासे पकडण्यासाठी बसलेल्या वडिलांच्या अंगावर टाकतो. त्याच्या वडिलांना तो साप आहे, असे कळते तेव्हा ते घाबरून नदीमध्ये उडी मारतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, नेटकरी त्यावर विविध कमेंट्स करताना दिसत आहेत. दरम्यान, चिमुकल्याच्या हातातील साप नकली असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा: भरकॉन्सर्टमध्ये श्वान स्टेजवर पोहोचला… पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dramebaazchhori99 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत सात दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “हा मुलगा खूप खतरनाक आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “बापरे! खूपच भयानक आहे हा.” तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “मुलींपेक्षा मुलं खूप त्रास देतात.” तर आणखी एकाने लिहिलेय की, “व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीनं त्याला थांबवलं का नाही?”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video the little boy grasped the snake and thrown at his father netizens were shocked to see the video sap