Viral Video: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. यावर सतत विविध रील्स, गाणी, कॉमेडी व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. असे व्हिडीओ काही क्षण का होईना अनेकांचे मनोरंजन करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे, ज्यात एक लहान मुलगी असं काहीतरी करतेय जे पाहून तुम्हालाही हसू येईल.
प्रत्येक व्यक्तीला कोणताना कोणतातरी छंद असतोच. कोणाला गाणं गायला आवडतं तर कोणाला चित्र काढायला आवडतं. डान्सदेखील अनेकांच्या आवडीचा छंद आहे, त्यामुळे डान्सवेडे लोक कधी आणि कोणत्या ठिकाणी डान्स करतील हे सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक चिमुकली चक्क चालू बाईकवर डान्स करताना दिसतेय. तिचा हा डान्स पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लहान मुलगी तिच्या बाबांबरोबर बाईकवरून प्रवास करत असून ती मागे बसल्या बसल्या अचानक काही डान्स स्टेप्स करायला सुरुवात करते. सुरुवातीला ती तिचे हात वर करत नंतर दोन्ही हाताने विविध स्टेप्स करायला सुरुवात करते, यावेळी ती तिचा एक पाय मागेदेखील करते. चालू बाईकवर करत असलेल्या स्टेप्स पाहून यावेळी मागून व्हिडीओ काढणारी मंडळी मोठ्याने ओरडून हसतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @siddu989_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत अठरा मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. तसेच यावर एक मिलियनहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. शिवाय या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लीक करा:
दरम्यान, यापूर्वी देखील अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक वयस्कर महिला चक्क एका विमानात डान्स करताना दिसली होती. तर आणखी एका व्हिडीओत एक तरुणी ट्रेनमध्ये डान्स करताना दिसली होती. हे व्हिडीओदेखील खूप चर्चेत आले होते.