Viral Video: बाप-लेकीचं नातं नेहमीच खूप खास समजलं जातं. बाप गरीब असो वा श्रीमंत तो आपल्या लेकीला नेहमीच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. असं म्हणतात, एखाद्या मुलीवर तिच्या वडिलांएवढे प्रेम जगात कोणीच करू शकत नाही. शिवाय मुलीदेखील आपल्या वडिलांना खूप जीव लावतात. त्यांच्यासाठी अनेक गोष्टी करतात, वडिलांनी दिलेली प्रत्येक गोष्ट मुलीसाठी खूप खास आणि लाखमोलाची असते. आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्हीही भारावून जाल.

जगातल्या प्रत्येक स्त्रीला सरप्राईज आणि गिफ्ट्स खूप आवडतात. मग ती लहान मुलगी असो किंवा एखादी वृद्ध स्त्री असो. आपल्या जीवलगांनी प्रेमानी दिलेली भेटवस्तू पाहून कोणतीही महिला आनंद व्यक्त करते. नुकत्याच व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्येदेखील एक लहान चिमुरडी गिफ्ट पाहून खूप आनंदी झाल्याचे दिसत आहे.

Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?
Brother uses Polaroid camera for sisters photoshoot
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’
Video of children warkari dance on bhajan songs
संस्कार याच वयात होतात! चिमुकले वारकरी थिरकले भजनाच्या तालावर, VIDEO एकदा पाहाच
Delhi CM Atishi
Video : बिधुरींच्या आक्षेपार्ह विधानानंतर वडिलांबद्दल बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अश्रू अनावर; म्हणाल्या, “ते इतके आजारी असतात की…”
Bride grand Welcome To The Chawla with Band
‘हा आनंद केवळ चाळीतच…’ नव्या सुनेचं असं स्वागत कधी पाहिलं नसेल; Viral Video पाहून आठवतील जुने दिवस
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लहान गोड मुलीला तिच्या बाबांनी उचलून घेतलेले आहे. यावेळी ते तिला सरप्राइज म्हणून एक भेटवस्तू देतात. त्यासाठी ते मुलीच्या हातात गिफ्टची पिशवी देतात, पिशवीतील गिफ्ट पाहून मुलगी खूप खूश होते. यावेळचे तिचे एक्स्प्रेशन पाहून तुम्हीही काही क्षण हरवून जाल. तिचे क्यूट एक्स्प्रेशन पाहून तिचे बाबादेखील खूप हसतात. त्यानंतर ते गिफ्ट बाहेर काढून तिला दाखवतात, त्यावेळी ती आणखी खूश होते आणि हसू लागते, हे पाहून तिचे बाबा पुन्हा हसतात.

हेही वाचा: असले मित्र नको रे बाबा! नवरदेवाच्या मित्रांनी लग्न विधी सुरू असताना गुरुजींच्या डोक्यात घातली पिशवी अन् पुढे जे घडलं… VIDEO पाहून व्यक्त कराल संताप

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vibe_post_2.0 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत जवळपास नऊ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. लाखो लाइक्सही मिळाल्या आहेत. शिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “मुलीपेक्षा बाबांचे एक्स्प्रेशन भारी आहेत.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “किती गोड मुलगी आहे.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “खूप क्यूट आहे मुलगी”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “त्यांच्या आयुष्यातला अनमोल क्षण आहे.”

Story img Loader