Viral Video: सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स व्हिडीओ, अशा प्रकारच्या विविध गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. सध्या ‘पुष्पा २’हा चित्रपट खूप चर्चेत असून या चित्रपटातील ‘सुसेकी’ हे गाणं खूप चर्चेत आले होते. तसेच २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ऊ अंटावा’, ‘बलम सामे’ ही गाणी डान्स स्टाईलमुळे खूप गाजली. आता याच चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टमधील ‘किसीक’ हे गाणे खूप चर्चेत आहे. ज्यावर नेटकरी रिल्स बनवताना दिसत आहेत.

समाजमाध्यमांमुळे लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. ट्रेंडिंग गाणी, नवीन चित्रपट, त्यातील डायलॉग मुलांचे तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रती मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. सध्या सुंदर डान्स करणाऱ्या चिमुकलीचा एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून प्रत्येक जण तिच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहे. या व्हिडीओतील चिमुकली ‘पुष्पा २’ मधील ‘किसीक’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

school students couple dance so gracefully on marathi song
“माझं काळीज लागलंय नाचु न गानं वाजू दया” जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांनी जोडीने केला भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
video of a young girl dance on 26 January
Video : “अशा शाळांवर कारवाई केली पाहिजे” २६ जानेवारीला तरुणीने सादर केलेला डान्स पाहून नेटकरी संतापले
Video of a little child presents amazing lavani dance in a school program
Video : काय भारी नाचतोय राव! जि.प. शाळेत चिमुकल्याने सादर केली अप्रतिम लावणी; नेटकरी म्हणाले, “याच्यासमोर सर्व लावणी सम्राज्ञी फिक्या..”
Mumbai local video of some girls dancing on a marathi song
‘तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला’ गाण्यावर मुंबई लोकलमध्ये तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिला का?
gilr dance
“ऐका दाजीबा….!”, मराठमोळ्या गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून तुम्हीही व्हाल तिचे चाहते
Mother daughter amazing duo did an amazing dance on the Koli song Video viral
“तो चक चक सोन्याचा…”; माय-लेकीची भन्नाट जोडी, कोळी गीतावर केले अफलातून नृत्य! Video पाहून सांगा, कोणी मारली बाजी?
Husband's Romantic Dance for Wife Wins Hearts
Video : भर रस्त्यावर तरुणाने बायकोसाठी केला जबरदस्त डान्स! हृतिक रोशनलाही टाकले मागे, व्हिडीओ एकदा पाहाच

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली ‘किसीक’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यावेळी चिमुकली करत असलेल्या डान्समधील स्टेप्स एकापेक्षा एक असून तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही लक्षवेधी आहेत. चिमुकलीचा डान्स पाहून युजर्स तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kathashinde या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर पन्नास हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

हेही वाचा: ‘म्हणून स्वभाव खूप महत्वाचा असतो…’ भर रस्त्यात मदतीसाठी बिबट्याची धडपड; लोक फक्त पाहत राहिले; पाहा घटनेचा थरारक VIDEO

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘खरंच सुंदर नाचतेस’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘खूप क्यूट आहे ही’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘एक नंबर डान्स’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘हिरोईन.’

Story img Loader