Viral Video: लहान मुलं कधी काय करतील हे कोणीही सांगू शकत नाही. अनेकदा ते मोठ्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. ज्यात कधी ते मोठ्यांप्रमाणे वागतात, बोलतात तर कधी असं काहीतरी करतात, जे पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. यामध्ये अनेकदा ते स्वतःच्या सुरक्षेचा विचार न करता स्वतःवर संकट ओढवून घेतात. नुकत्याच व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, ज्यातील दोन लहान मुली असं काही करत आहेत जे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

समाजमाध्यमांवर हल्ली आपण विविध प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पाहतो. यातील काही व्हिडीओ आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडचे असतात, कारण या व्हिडीओंमध्ये आपल्याला असं काहीतरी पाहायला मिळतं, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून नेटकरीही शॉक झाले आहेत.

Father dance for his daughter on wedding day heart touching Video
“मेरी दुनिया तू ही रे” लेकीच्या लग्नात वडिलांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून प्रत्येक मुलीच्या डोळ्यांत येईल पाणी
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
wife Fraud with husband, Navy officer wife Fraud,
बँकेच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून पतीच्या जमिनीवर परस्पर कर्ज
Heart touching Advertise banner against son from father life lessons for son photo viral on social media
Photo: “कोणत्याच बापावर अशी वेळ येऊ नये” वयात येणाऱ्या मुलाला प्रत्येक बापानं दाखवावी अशी जाहिरात; नक्की वाचा
Sunil Soman Statement on National Defence Pune news
‘आधी देशरक्षण, मगच कुटुंबाकडे लक्ष…’ सेनाधिकाऱ्याच्या या उद्गारांनी जेव्हा भारावतात श्रोते
Ratan Tata funeral police crying front of Shantanu naidu emotional Photos goes viral on social media
खाकीलाही जेव्हा रडू येतं! रतन टाटांच्या अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनाही अश्रू अनावर; शेवटचा क्षण पाहून येईल अंगावर काटा
UP Crime Scene
UP Crime : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे आख्खं कुटुंब उद्ध्वस्त! प्रियकराने एकाचवेळी केली चौघांची हत्या; चिमुरड्या मुलींवरही घातल्या गोळ्या
A boy Rishab Dutta from Assam singing Lag Ja Gale song before death in hospitals bed
“..शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो” आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या तरुणानं गायलं गाणं, VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तीन लहान मुली एका ठिकाणी बाईक घेऊन येतात. त्यातील सर्वात मोठी मुलगी तिच्याबरोबर असलेल्या दोघींना उचलून बाईकच्या मागच्या सीटवर बसवते आणि स्वतः पुढे बसून बाईक सुरू करण्याचा प्रयत्न करते. बरेच प्रयत्न केल्यानंतर बाईक सुरू होते आणि ती इतर दोघींना घेऊन बाईकवरून पसार होते. एवढ्या लहान वयात चिमुकल्या मुलींची ही करामत पाहून तुम्हीही कपाळावर हात मारून घ्याल.

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @status__media_01 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

हेही वाचा: शेवटी कर्माचे फळ मिळतेच…’ श्वानाला स्टेजवरून फरपटत नेणाऱ्या व्यक्तीबरोबर झालं असं काही…; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कर्म चांगले ठेव..”

पाहा व्हिडीओ:

एकाने लिहिलंय की, या दोघींना आपल्या मोठ्या बहिणीवर किती विश्वास आहे, तर दुसऱ्या एकाने लिहिलंय की, “या वयात मला काही कळतपण नव्हतं.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “बस, आता हेच बघायचं राहिलं होतं”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, म्हणून सांगतो लहान मुलांवर लक्ष ठेवा.”