Viral Video: देश एकीकडे प्रत्येक क्षेत्रात सुधारणा करीत यशाच्या पायऱ्या चढून जात आहे; तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचार, बलात्कार, शोषण, मारहाण अशा समस्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दर दिवशी देशाच्या विविध भागांतून अशा घटनांचे व्हिडीओ, फोटो सतत व्हायरल होत असतात, ज्यावर संताप व्यक्त करण्याशिवाय कोणी काहीही करत नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी महिला कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातो. रस्त्यावरून चालताना अनेकदा महिलांना वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो. आता अशीच एक घटना दाखवणारा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका बसथांब्यावर बस येताच सर्व जण बसमध्ये चढतात. यावेळी तिथे उभी असलेली एक महिलादेखील बसच्या दरवाजाजवळ जाताच मागे उभा असलेला एक माणूस तिच्या कंबरेला पकडून, तिला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतो. त्या माणसाने आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे कळताच ती महिला सावध होते आणि सरळ बसमधून खाली उतरून, त्या व्यक्तीला मारहाण करायला सुरुवात करते. यावेळी आसपासचे लोक तिथे जमा होतात आणि त्या महिलेची विचारपूस करतात. यावेळी ती त्यांना झालेला संपूर्ण प्रकार सांगते. यावेळी जमा झालेले लोक त्याला जाब विचारतात. परंतु, तो आपण काहीच न केल्यासारखा आव आणून, त्या लोकांशीच दादागिरीने वागण्याचा प्रयत्न करतो.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @marathi_newspaper या अकाउंटवर शेअर करण्यात आला आला आहे. त्यावर आतापर्यंत सहा लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

तसेच एका युजरनं यावर लिहिलंय, “मूर्खपणाचा कळस.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “ही घटना खरी आहे की स्क्रिप्टेड.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “त्याच्या आईच्या वयाची आहे ती.”

Story img Loader