लहान मुलांचे व्हिडीओ सर्वच जण आवडीने पाहत असतात. सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हिडीओ तर लहान मुलांचेच असतात. ते आपले मनोरंजनही करतात आणि कधी कधी आपल्या घाबरवतात. हल्लीची मुलं आता इतकी बिनधास्त असतात की त्यांना आपण एखाद्या गोष्टीची भीती जरी दाखवली तर ते भीत नाहीत. उलट तेच आपल्याला घाबरवून सोडतात. अशाच एका खोडकर मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. 


या व्हायरल व्हिडीओमधला लहान मुलगा किती अतरंगी असेल, याची कल्पना तुम्हाला येईल. पण सोबत तुम्हाला तुमच्या बालपणीची आठवण देखील आल्याशिवाय राहणार नाही. पूर्वी लहान मुलं साधी झुरळे जरी पाहिली तरी घाबरत असत, पण या व्हायरल व्हिडीओमधला लहान मुलगा त्याच्या हाताने चक्क पाल पकडतोय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घराच्या छतावर तो खेळत असताना त्याला पाल दिसते. ते पाहून या मुलाच्या मनात एक प्लॅन सुचला आणि त्याच्या या प्लॅनमुळे संपूर्ण घरातल्या महिलांनी आरडाओरड सुरू केली. 

आणखी वाचा : त्सुनामी सारखे ढग तुम्ही कधी पाहिलेत का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच


या खोडकर मुलाने पाल आपल्या हातात पकडली आणि ती घेऊन तो घरातल्या महिलांकडे गेला. ती पाल महिलांच्या अंगावर फेकल्यासारखं नाटक करून या खोडकर मुलाने महिलांची चांगलीच तारांबळ केली. यातली एक महिला या चिमुकल्याला ती पाल फेकून देण्यासाठी सांगताना दिसून येतेय. तर दुसऱ्या महिलेने आपला रस्ता वळवत पळ काढला. हे पाहून चिमुकला हातातली पाल घेऊन त्या महिलेच्या मागे धावत गेला. इवल्याश्या मुलाने घरातल्या सगळ्या महिलांची चांगलीच धांदल उडवली. या चिमुकल्याला कशाचीच भीती वाटत नाही, असं दिसतंय. इतका लहान असून सुद्धा त्याने स्वतःच्या हाताने पाल पकडली, हे पाहून सारेच जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. 

आणखी वाचा : दोन सूनांमध्ये जबदरस्त फाईट, भांडताना नाल्यातच पडल्या आणि तिथेही…; करोडपती कुटुंबातील भांडणाचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘छप्पर फाडके…’ !  एटीएममधून पाच पटीने जास्त कॅश निघू लागली, मग काय…बातमी मिळताच लोकांची रांग लागली
हा व्हिडीओ bhutni_ke_memes नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ एक दिवसापूर्वीच शेअर करण्यात आला होता. त्यानंतर बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. या व्हिडीओला आतापर्यंत ६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसून येत आहेत. मुलाची ही मस्ती पाहून सारेच जण या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. 

Story img Loader