Viral Video : कुत्रा हा माणसाच्या अतिशय जवळचा प्राणी आहे. कुत्रा आणि माणसाच्या मैत्रीचे अनेक उदाहरणे तुम्ही ऐकली असेल किंवा पाहिली असेल. कुत्रा हा अतिशय प्रामाणिक प्राणी असून त्यालाही माणसाप्रमाणे भावना आहे. अनेक लोक आवडीने घरी कुत्रा पाळतात. त्याला घरच्या एका सदस्याप्रमाणे वागवतात. त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात. त्याची काळजी घेतात. कुत्रा सुद्धा मालकावर जीव ओवाळून प्रेम करतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीला दोन महिन्यापूर्वी हरवलेला तिचा कुत्रा सापडला आहे. हरवलेल्या कुत्र्याबरोबर या तरुणीची जेव्हा भेट होते तेव्हा नेमकं काय घडतं, हे तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसून येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्हाला एक तरुणी रस्त्याने जाताना दिसेल. अचानक या तरुणीला तिचा कुत्रा दिसतो आणि कुत्र्याला सुद्धा त्याची मालकीण दिसते. तेव्हा कुत्रा धावत तिच्याकडे येतो आणि मिठी मारायला लागतो, तिचे लाड करतो. त्याचे प्रेम पाहून तुम्हीही भारावून जाल. तरुणी सुद्धा त्याला पाहून ओरडते आणि त्याला जवळ घेते. एवढ्या दिवस कुठे होता बेटा, कसा आला, इथे कसा आला, कुठे गेला होता असं विचारत ही तरुणी सुद्धा या कुत्र्याचा लाड करते आणि भावुक होते. त्यानंतर ती त्याला कडेवर उचलते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. काही लोकांना अश्रु आवरणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Minor boy arrested for killing infant G
१५ वर्षांचा प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चार महिन्यांचे बाळ आणि माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Ajit pawar gives Sharad Pawar Health Update
Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांची महत्त्वाची माहिती; म्हणाले, “त्यादिवशीच त्यांना…”
flying first class for the very first time
पहिली वेळ नेहमीच खास असते! चिमुकलीचा पहिला विमान प्रवास आईने केला स्पेशल; VIDEO तील प्रत्येक सोय पाहून उंचावतील भुवया
viral video unhealthy vegetables flower selling in market with chemical shocking video goes viral on social media
आता तर हद्दच पार केली! महिलांनो ‘हा’ VIDEO पाहिला तर यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल
rahul gandhi arvind kejriwal (1)
‘या’ धर्मातील नागरिकांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, मोफत तीर्थयात्रा घडवणार; केजरीवालांवर भेदभावाचे आरोप
Saif ali khan medicl clm
Saif Ali Khan : सैफला उपचारांसाठी ४ तासांत २५ लाखांची मंजुरी कशी मिळाली? विमा कंपनीच्या तत्परतेमुळे चर्चांना उधाण; AMC कडून तक्रार
Shocking Video Dispute between two neighbours over sweeping broom fight viral on social media
‘ती’ घराबाहेर कचरा काढायला गेली अन्…, दोन शेजाऱ्यांमध्ये पेटला वाद! पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, VIDEO बघून सांगा चूक कोणाची

पाहा व्हायरल व्हिडीओ

husky.hazel1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “टिल्लू आमच्या परिसरातून 2 महिन्यांपासून बेपत्ता झाला होता. काल तो दुसऱ्या परिसरात दिसला. भेटीदरम्यान आम्ही भारावून गेलो” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माणसाला लाजवेल असं प्रेम आणि कृतज्ञता” तर एका युजरने लिहिलेय, “हे प्रेम मिळायला पण नशीब लागत…आणि ते सगळ्यांच्या नशिबात नसतं” आणखी एका युजरने लिहिलेय, “तु जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे” एक युजर लिहितो, “हेच ते निस्वार्थी प्रेम जे माणसाला माणसाकडून कधीच मिळत नाही” तर एक युजर लिहितो, “डोळ्यातील प्रेम आणि यातना” अनेक युजर्सनी त्यांचे त्यांच्या कुत्र्या बरोबरचे नात्याविषयी सांगितले आहे. काही युजर्स व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत.

Story img Loader