Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही, यातील काही व्हिडीओंमुळे आपल्या चेहऱ्यावर हसू येतं; तर काही व्हिडीओंमुळे आपल्या काळजाचा थरकाप उडतो. सोशल मीडियावर बऱ्याचदा प्राण्यांचेही अनेक विविध प्रकारचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, ज्यामध्ये अनेकदा काही प्राणी एकमेकांशी भांडण करताना दिसतात, तर काही प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी चक्क माकडांबरोबर मस्ती करताना दिसतेय. पण, यावेळी अचानक असं काहीतरी होतं जे पाहून तुम्हाला धक्का बसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राणीदेखील मनुष्यांप्रमाणेच हुशार असतात. त्यांनाही माणसांप्रमाणे भावना असतात, त्यामुळे त्यांना जर कोणी विनाकारण त्रास देत असल्यास ते त्यावर लगेच प्रतिकार देतात. या व्हायरल व्हिडीओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळतं.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी झाडाच्या फांदीवर बसून माकडांना चणे खाऊ घालत आहे. तसेच यावेळी ती त्यांच्यासोबत मस्तीदेखील करत आहे. यावेळी मस्ती करता करता ती माकडाला, “मला रक्षाबंधनचे गिफ्ट काय देणार असं विचारते” आणि त्याला गुदगुल्या करते, त्यामुळे माकड रागाच्या भरात तिचे केस ओढते. ऐवढं होऊनही ही तरुणी माकडाला पुन्हा गुदगुल्या करते. यावेळी माकड तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @connect_2_v या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत ४८ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर एक मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

हेही वाचा: “आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, चिमुकलीने भररस्त्यात केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘ताई खरंच तुझ्यामध्ये खूप हिम्मत आहे’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘अरे बापरे, याला म्हणतात हिम्मत’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘असे लोक तुम्हाला भारतातच पाहायला मिळतील.’ तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘ताई सांभाळून, काही माकडं खूप भयानक असतात.’