Viral Video: समाजमाध्यमांवर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही, यातील काही व्हिडीओंमुळे आपल्या चेहऱ्यावर हसू येतं; तर काही व्हिडीओंमुळे आपल्या काळजाचा थरकाप उडतो. सोशल मीडियावर बऱ्याचदा प्राण्यांचेही अनेक विविध प्रकारचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, ज्यामध्ये अनेकदा काही प्राणी एकमेकांशी भांडण करताना दिसतात, तर काही प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एका महिलेबरोबर असं काहीतरी करतोय जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

अनेकांना प्राणी खूप प्रिय असतात. पण, तेच प्राणी त्यांच्याबरोबर कधी काय करतील हे सांगता येत नाही. माणसांनी कितीही जीव लावला तरी बऱ्यचदा प्राणी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय ज्यात एक माकड महिलेला त्रास देताना दिसत आहे.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक माकडप्रेमी महिला जंगालात माकडांना खायला देण्यासाठी गेली असताना त्यावेळी अचानक एक माकड येते आणि तिच्या अंगावर बसते. यावेळी तो तिच्या केसांमध्ये वाकून बघते. नंतर गळ्यातील स्कार्फ काढून घेण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर ती महिला माकडाबरोबर एक सेल्फी काढते.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @connect_2_v या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर पाच हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

हेही वाचा: ‘नाच गं घुमा’ या मराठमोळ्या गाण्यावर परदेशातील चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायक कौतुक

पाहा व्हिडीओ:

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘अरे देवा हे काय?’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘अरे बापरे, याला म्हणतात हिम्मत’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘खूप खूप प्रेम दोघांना’ तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘ताई सांभाळून, काही माकडं खूप भयानक असतात.’