Viral Video: समाजमाध्यमांवर सतत विविध गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओंमुळे आपल्या चेहऱ्यावर हसू येतं; तर काही व्हिडीओंमुळे आपल्याला धडकी भरते. सोशल मीडियावर बऱ्याचदा प्राण्यांचेही अनेक विविध प्रकारचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, ज्यामध्ये अनेकदा काही प्राणी एकमेकांशी भांडण करताना दिसतात, तर काही प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी काही माकडांना खाऊ घालताना दिसतेय. पण, तिच्याबरोबर असं काही घडतं, जे पाहून तुम्हीही शॉक व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्राणीदेखील मनुष्यांप्रमाणेच हुशार असतात. त्यांनाही माणसांप्रमाणे भावना असतात आणि त्यामुळे त्यांना जर कोणी विनाकारण त्रास देत असल्यास ते त्यावर लगेच प्रतिकार देतात. तसेच जर कोणी त्यांना जीव लावत असेल, तर तेदेखील त्या व्यक्तींवर हक्क दाखवतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीसं पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी रस्त्याच्या कडेला उभी राहून तिच्या बॅगेतील खाऊ माकडांना खायला देत आहे. यावेळी तिला खाऊ देताना पाहून ४-५ माकडं तिच्या जवळ येतात आणि तिच्या हातातून खाऊ खेचून घेण्याचा प्रयत्न करतात. यावेळी त्यांच्यातील एक जण चक्क तिच्या डोक्यावर जाऊन बसतो आणि तिच्या बॅगेतील खाऊ खायला सुरुवात करतो. माकडाचं हे कृत्य पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @connect_2_v या अकाउंटवरून शेअर केला गेला असून, त्यावर आतापर्यंत ७४ हजारांहून अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत आणि चार हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत.

हेही वाचा: ‘नाद पाहिजे ओ…’ भरमंडपात हातात वीणा घेऊन त्याने ठेका धरला… छोट्या वारकऱ्याचा VIDEO पाहून म्हणाल “शेवटी संस्कार महत्त्वाचे”

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय की, ‘ताई तो शेवटी माकड आहे आणि तुम्ही माणूस; जरा सांभाळून राहा.’ तर दुसऱ्या युजरने लिहिलेय की, ‘अरे बापरे, याला म्हणतात हिंमत.’ तर आणखी एकाने लिहिलेय की, ‘बापरे, मी असतो तर घाबरलो असतो.’ तर आणखी एकाने लिहिलेय की, ‘ताई, तुमच्या माकडांवरील प्रेमाला सलाम.’