Viral Video: समाजमाध्यमांवर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यातील काही व्हिडीओ आपल्याला खळखळून हसवतात, तर काही व्हिडीओ पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकवतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

असं म्हणतात, जगात आई एवढे प्रेम तिच्या मुलांवर कोणीही करू शकत नाही. मग ती आई एखादी व्यक्ती असो किंवा प्राणी, आई नेहमीच प्रत्येक गोष्टीत स्वतःआधी आपल्या लेकरांचा विचार करते. वाईट लोकांपासून आपल्या मुलांना वाचवते, त्यांना ठेच जरी लागली तरी तिचे डोळे पाणवतात. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत याउलट चित्र पाहायला मिळत आहे, जे एक आई आपल्या मुलाबरोबर असं काही करू शकते यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका स्विमिंग पुलाच्या बाजूला एक महिला आपल्या लहान मुलाला घेऊन येते आणि सरळ त्याला उचलून पाण्यात फेकते. तो मुलगा पाण्यात पडताच पोहण्याचा प्रयत्न करत करत पुन्हा वर येतो आणि पाण्यावर तरंगताना मोठमोठ्याने रडायला सुरुवात करतो. यावेळी मध्ये मध्ये मुलाच्या नाका-तोंडात पाणी जातं, परंतु त्याची आई पाण्यात असूनही त्याला पाण्यातून बाहेर न काढता त्याच्याकडे एकटक पाहत राहते.

खरंतर हा व्हायरल व्हिडीओ परदेशातील असून परदेशात लहान मुलांना स्विमिंग शिकवण्यासाठी अशी पद्धत वापरली जाते. परंतु, यामध्ये एखाद्या कोवळ्या जीवाचा जीवही जाऊ शकतो, याची काळजी घ्यायला हवी.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ X वरील @DefiantLs या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत चार मिलियनहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने लिहिलंय की, “हो, मुलांना पोहायला शिकवणं गरजेचं आहे, पण त्यासाठी त्यांच्या जीवाशी खेळू नका”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “मी एक स्विमिंग कोच आहे, पण मी माझ्या मुलांना असं कधीच घाबरवलं नाही”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “बापरे, हे खूपच भयानक आहे.”

Story img Loader