Viral Video: सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ पाहून आपले मनोरंजन होते, तर काही व्हिडीओ पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वाहनचालकाच्या हलगर्जीपणामुळे किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीमुळे अनेकदा मोठमोठे अपघात होतात. त्यातील अनेक अपघातांमध्ये चूक नसूनही निष्पाप जीवांना आपला जीव गमावावा लागतो. त्यापैकी काही अपघातांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावरदेखील व्हायरल होतात. अशाच अपघाताची एक दुर्घटना समोर आली आहे. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका पेट्रोल पंपाजवळ वृद्ध गरीब व्यक्ती उभा असून यावेळी एक ट्रकचालक तिथे येतो आणि त्या व्यक्तीला ट्रकने धडक मारतो. ट्रकने धडक मारल्यामुळे ती व्यक्ती जमिनीवर कोसळते आणि त्या ट्रकच्या पुढच्या डाव्या चाकाखाली चिरडली जाते. व्यक्तीला ट्रकखाली चिरडल्यानंतर आसपासचे काही लोक तिथे धावत येतात आणि त्या व्यक्तीला ट्रक खालून काढतात.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kerala_bikes_trops या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्याला अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्सही यावर कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “या ट्रायव्हरमध्ये माणुसकी नाही”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “गरीबाला जगायचा अधिकार नाही का?”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “भयानक दृश्य आहे”