Viral Video: कुत्रा अनेकांचा आवडता प्राणी आहे. या पाळीव प्राण्यावर लोकांचे जीवापाड प्रेम असते. कुत्र्याला घरातील सदस्याएवढीच उत्तम वागणूक दिली जाते. शिवाय त्याची आवड-निवडही पूर्ण केली जाते. अलीकडे अनेक जण कुत्र्याचा वाढदिवसदेखील आवडीने साजरा करतात, त्याला फिरायला घेऊन जातात. अशा अनेक कौतुक सोहळ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात; शिवाय या लाडक्या प्राण्याचे त्यांच्या घरातील अनेक मजेशीर व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर खूप व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही हसू येईल.

आईचा ओरडा खाणं आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही. आपल्या वाईट गोष्टींवर नेहमीच आईचे लक्ष असते, ज्यावरून ती आपल्याला सतत ओरडत असते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे; पण यामध्ये आई तिच्या मुलांना नाही तर श्वानाच्या पिल्लाला ओरडताना दिसतेय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Dog Vs Chicken Fight See Who Will Win Animal Video Viral surprise after result dog scared from this bird watch viral video
“हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला घरातील पाळीव श्वानाला त्याच्या अगाऊपणामुळे ओरडताना दिसत आहे. यावेळी ती त्याला बरंच काही बोलते. हातवारे करून त्याला समजावून सांगते. यावेळी तो श्वान घाबरून भिंतीला टेकून उभा राहतो आणि केविलवाण्या नजरेने महिलेकडे पाहतो, त्या श्वानाचा चेहरा अगदी रडवेला झाला होता. श्वानाला बराचवेळ ओरडल्यानंतर महिला त्याला तिथून जायला सांगते, त्यानंतर तो त्याच्या पिंजऱ्यात जाऊन बसतो. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @gurmehak.28 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास सहा मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “वा किती गोड आहे हा”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “सेम टू सेम आईसारखं”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “जबरदस्त अभिनय”, तर अनेक जण या व्हिडीओवर हसताना दिसत आहेत.

हेही वाचा: मज्जाच मज्जा! चिखलात खेळणाऱ्या हत्तीच्या गोंडस पिल्लाला पाहून पोटधरून हसाल; व्हायरल VIDEO एकदा पाहाच

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, यापूर्वीदेखील कुत्र्यांचे असे अनेक गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यातील एका व्हिडीओत एक मालकीण श्वानाला चिकन दाखवून भाजी खायला घालत होती, तर आणखी एका व्हिडीओमध्ये श्वान मालकिणीला चकवून पाण्यात भिजायला गेला होता.

Story img Loader