Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपल्या नजरेस पडत असतात, ज्यात काही प्राण्यांचेही व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये ज्यात कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कुत्रा सशाची शिकार करताना दिसतोय.
प्रत्येक जण आपली भूक भागविण्यासाठी संघर्ष करत असतो. हिंस्त्र प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी जंगलातील प्राण्यांवर हल्ला करून आपली भूक भागवतात. हिंस्र प्राण्यांसाठी ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो त्यालाही आपला जीव वाचावा, असं वाटतं. त्यामुळे तोदेखील जीवाच्या आकांतानं शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते; तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक थरारक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक कुत्रा सशाची शिकार करताना दिसत आहे.
आजपर्यंत आपण ऐकलेल्या ससा आणि कासवाच्या दंतकथेमध्ये चतुर आणि चपळ असणारा ससा त्याच्या हलगर्जीपणामुळे कासवाबरोबरची शर्यत हरतो. त्यामुळे सशाला अनेक जण आजही आळशीच समजतात. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सशाचं असं रूप पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्हीही शॉक व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घनदाट जंगलामध्ये एक कुत्रा शिकार करण्यासाठी सशाचा पाठलाग करतो. यावेळी आपला जीव वाचविण्यासाठी ससा जीव तोडून पळत सुटतो. त्यानंतर आणखी एक कुत्रा सशाचा पाठलाग करतो. दोन कुत्र्यांच्या तावडीतून स्वतःला वाचवण्यासाठी ससा खूप वेगानं धावतो. यावेळी सशाचा पाठलाग करून करून कुत्र्यालाही दम लागल्याचे दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @apali_chandoli या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर ‘ससा कासवाबरोबर शर्यत हरला हे खोटं सांगितलं आहे आपल्याला’ असं लिहिण्यात आलं आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाल्या असून, त्यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.
एकानं लिहिलंय, “अरे, ती शर्यत होती; इथे जीवाचा प्रश्न आहे.” दुसऱ्यानं लिहिलंय, “ससा त्याच्या मस्तीमुळे हरलाय; धावण्यामुळे नाही.” तिसऱ्यानं लिहिलंय, “समोर मरण दिसलं की, सगळे पळतात भावा.”