Viral Video: सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात काही मजेशीर व्हिडीओ आपण पाहतो. त्यात अनेकदा प्राण्यांचे खूप मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतात. पण, बऱ्याचदा काही व्हिडीओ असेही असतात, जे पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. सध्या असाच एक काळजाचा ठोका चुकविणारा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचादेखील थरकाप उडेल.

बैल हा एक असा प्राणी आहे की जो खवळला तर कधीही काहीही करू शकतो. अशा वेळी त्याला नियंत्रणात ठेवणंदेखील खूप कठीण असतं. मागील काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील अशाच एका बैलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्यानं अनेकांवर हल्ला केल्याचं दिसलं होतं. या प्रकरणानंतर आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यात तो बैल असं काहीतरी करतोय, जे पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?

हा व्हायरल व्हिडीओ परदेशातील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, एका मैदानामध्ये उधळलेल्या बैलाला सोडण्यात आलं असून या मैदानात अनेक उत्साही पुरुषही बैलाशी सामना करण्यासाठी उभे असल्याचे दिसत आहेत. यावेळी बैलाला विविध रंगाचा कपडा आणि अनेक गोष्टी दाखवून भडकावलं जात आहे. खरं तर हा एक खेळ असून अनेक देशांमध्ये तो खेळला जातो. पण, या खेळात अनेकांना आपल्या जीवाची बाजी लावावी लागते. या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे. पुढे तो बैल थेट मैदानाच्या कुंपणावरून बाहेर जातो. बैल बाहेर जाताच बाहेर उभे असलेले लोकही इकडे तिकडे जीवाच्या आकांताने पळत सुटतात.

हेही वाचा: ‘सोनी कितनी सोनी आज तू लगती वे…’ गाण्यावर मुंबईतील रस्त्यावर परदेशातील तरुणांचा भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ayuntamientopenafiel या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याशिवाय या व्हिडीओला आतापर्यंत १७० मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि दोन मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

एका युजरने लिहिलंय की, “हे खूप भयानक आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “बापरे डेंजर आहे सीन”, तर आणखी एकानं लिहिलंय, “अंगावर काटा आला”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “कशाला आपला जीव धोक्यात घालायचा उगाच?”

Story img Loader