Viral Video: लहान मुलं खरंच खूप गोड आणि निरागस असतात. त्यांचं बोलणं, वागणं याकडे नकळत आपलं लक्ष वेधलं जातं. हल्ली सोशल मीडियामुळे तर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर शाळेतील अनेक चिमुकल्यांचे नवनवीन व्हिडीओ सतत पाहायला मिळतात, ज्यात कधी अनेकदा ते विविध कविता हटके पद्धतीने सादर करताना दिसतात. काही महिन्यांपूर्वी एका ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थिनींची ‘बटरफ्लाय बटरफ्लाय’ ही कविता खूप व्हायरल झाली होती. दरम्यान, आताही अशीच एक कविता म्हणत असलेल्या मुलाचा व्हिडीओ समोर आला आहे.
शाळेतील दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप खास दिवस असतात. शाळेतील शिक्षकांकडून शिकलेल्या कविता, गोष्टी अनेकांच्या वर्षानुवर्षे लक्षात राहतात. मुलांचे शाळेत मन रमावे, त्यांच्या मनात शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेतील शिक्षक नेहमीच पाठ्यपुस्तकातील कविता चाली लावून गायला शिकवतात. कधी या कवितांवर डान्सही केला जातो. आता समोर आलेल्या या व्हिडीओतही एक चिमुकला शाळेतील कविता खूप सुंदर पद्धतीने म्हणताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला त्याच्या वर्गमित्रांसह शाळेच्या पटांगणात उभा असून यावेळी तितली उडी ही कविता म्हणायला सुरुवात करतो. कविता म्हणताना त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावांमुळे अनेकांचे लक्ष वेधले जात आहे. त्याच्या या कवितेला एका युजरने चाल देऊन रिमिक्स केली आहे, ज्यामुळे ही कविता ऐकायला खूप छान वाटत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kartaonthemusic या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत १० दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. अनेक युजर्स कमेंट्सही करीत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “व्वा व्वा खूपच सुंदर”. दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “अरे व्वा खूप हुशार आहे हा”. आणखी एकानं लिहिलंय की, वाईब आहे भावा. आणखी एकानं लिहिलंय की, “मला खूप आवडलं”.