आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी परीक्षेत पास होण्यासाठी कॉपी केली असेल किंवा तुमच्या सहकाऱ्याने केलेली कॉपी पाहिली असेल. शिवाय कॉपी म्हणजे चक्क आपल्या गुरुला फसवणं असतं. त्यामुळे आपले गुरु आपल्यापेक्षा हुशार असतात यात शंका नाही. त्यामुळे खुद्द शिक्षकांना फसवायचं असेल तर सामान्य पद्धतीने कॉपी करुन चालत नाही. यासाठी कॉपी करणारी मुलंदेखील खूप डोकं लावून ती शिक्षकांना सापडणार नाही अशा ठीकाणी लपवण्याचा प्रयत्न करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या अशाच एका विद्यार्थ्याने कॉपी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो परीक्षेसाठी जात असताना त्याने केलेली कॉपी शिक्षकांनी पकडल्याचं पाहायलं मिळतं आहे. मात्र, त्याने केलेली कॉपी पाहून मात्र नेटकऱ्यांचं चांगलचं मनोरंजन होतं आहे. कारण, या विद्यार्थ्याच्या कॉपी करण्याचा आणि त्याच्या शिक्षकांचा बोलण्याचा अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही पाहा- Viral Video: सापाला छेडणं अंगलट, चक्क हवेत उडत साप गेला कॅमेरामनच्या अंगावर अन् घडली जन्माची अद्दल

या व्हिडीओत एक विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये जात असताना काही शिक्षकांनी त्याच्याकडे कॉपी आहे का तपासतात. यावेळी त्याच्या पॅंटमध्ये एक मोठा कागद सापडतो. मात्र, त्याने ती आपल्या पॅंटमध्ये गुडघ्याच्या खाली लपवून ठेवली होती, ती पाहून शिक्षक म्हणाले की, कॉपीचा अख्खा समुद्रच आणला आहेस की काय?. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ ४५ सेकंदांचा आहे, ज्यामध्ये परिक्षेसाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांना शिक्षक रांगेत उभे करतात आणि त्यांच्याकडे काही कॉॉपी आहे का तपासतात. यावेळी एका विद्यार्थ्यांना शूज काढण्यास सागंतात. त्याच्या बुटात काहीच सापडत नाही. त्यानंतर या विद्यार्थ्याच्या पॅंटमध्ये काहीतरी असल्याचा आवाज येताच शिक्षक त्याला पॅंट वर उचलायला सांगतात. त्यावेळी मात्र, या विद्यार्थ्याची कॉपी सर्वांना दिसते. शिवाय त्याने एक तुकडा नव्हे तर वहीचा एक अख्खा कागद आणल्याचं पाहून शिक्षक त्याला ‘कॉपीचा अख्खा समुद्रच आणला आहेस की’ असं म्हणताना दिसतं आहेत.

हेही पाहा- आई त्यागाची मूर्ती! कुत्र्यांच्या तावडीतून पिल्लाला वाचवण्यासाठी तिने स्वत:ला केलं कुर्बान; पाहा हृदयद्रावक Video

हा व्हिडीओ @Gulzar_sahab या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ आतापर्यंत ७ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओतील मुलावर नेटकऱ्यांनी चांगलीच टीका केली आहे. कॉपी करायलाही अक्कल लागते अशा कमेंट नेटकरी या व्हिडीओवर करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video the student cheating in exam teachers were not tempted to make videos jap
Show comments