Viral Video: समाजमाध्यमांवर आपण अनेकदा शाळा किंवा महाविद्यालयामधील शिक्षकांचे शाळेत कविता शिकवितानाचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. हल्ली सोशल मीडियामुळे असे व्हिडीओ खूप चर्चेत येतात. आता असाच एक व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी शाळेबाहेर एका मराठी गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

शाळा म्हटलं की, आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं, शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणींत घर करून राहतात. या जगात अशी एकही व्यक्ती नसेल, ज्याच्या शाळेशी जोडलेल्या काही आठवणी नसतील. शाळेतल्या गोड गमती-जमती आणि मित्र-मैत्रिणी, शिक्षकांनी शिकवलेल्या कविता, गोष्टी नेहमीच आपल्या स्मरणात असतात. सध्या एका शाळेतील असाच एक सुंदर व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही तुमच्या शाळेचे दिवस आठवतील.

Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Boys dance on nach re mora ambyahya vanat song at school get together function funny video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गेट दुगेदरला शाळेतल्या जुन्या मित्रांनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Couples unique dance
”हृदयी वसंत फुलताना..” गाण्यावर काका काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
Marathi School's amazing Wall Art showcasing Lalpari Goes Viral
लालपरी नव्हे तर शाळा आहे ही! मराठी शाळेतील VIDEO होतोय व्हायरल
Techer Make student cutout
शिक्षिकेच्या कार्याला सलाम! विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर बनवलं तिचं कटआऊट; VIRAL VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ एका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळेतील काही विद्यार्थी शाळेबाहेरच्या निसर्गरम्य परिसरात ‘येरे येरे पावसा’ गाणं म्हणत नाचताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांचा हा आनंद पाहून युजर्सही त्यांचे कौतुक करीत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @lahuborate या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर, “येरे येरे पावसा हे गाणं ऐकून व गाऊन आपण लहानाचे मोठे झालो आहोत. पाऊस म्हटलं की, चिमुकल्यांचा आनंद चरमसीमेवर असतो. किती नाचू आणि किती नाही याचा भान त्यांना राहत नाही. बेभान होऊन ते आनंद घेतात. लहानपणी आपणही असे खूप नाचलेलो आहोत. त्या आठवणी हृदयाच्या कप्प्यात बंद करून ठेवलेल्या आहेत. आताही पावसात भिजत असू; पण तो आनंद, ती मजा मिळत नाही,” अशी सुंदर कॅप्शन लिहिली आहे.

हेही वाचा: “जीवन-मरणाचा खेळ…” दोन जिराफांवर हल्ला करण्यासाठी सिंहाचा डावपेच; असा धडकी भरवणारा VIDEO कधीही पाहिला नसेल

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओवर आतापर्यंत २६ हजारांहून अधिक व्ह्युज आणि त्यावर अनेक लाइक्स आल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. त्यातील एका युजरने लिहिलेय, “खरंच खूप सुंदर व्हिडीओ आहे गुरुजी.” दुसऱ्या युजरने, “हा व्हिडीओ पाहून जुने दिवस आठवले”, असे लिहिले आहे. तसेच इतरही काही जण या व्हिडीओचे कौतुक करीत आहेत.

Story img Loader