Viral Video: शहरातील मोठमोठ्या शाळांतील शिक्षक असोत किंवा एखाद्या खेडेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणारे शिक्षक असोत; प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत खूप वेगवेगळी असते. गावाकडच्या अनेक शाळांमध्ये शिक्षणाबरोबरच इतर आवड निर्माण करणाऱ्या गोष्टीही शिकवल्या जातात. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी ही मुलं नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर करताना दिसतात. ज्यामध्ये कधी ते सुंदर डान्स करताना दिसतात, तर काही जण सुंदर भाषण करताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील मुलगाही त्याची हीच कला सादर करताना दिसत आहे.

शाळा म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं, शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करून राहतात. हल्ली सोशल मीडियावर गावाकडच्या शाळांमधील अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यातील काही व्हिडीओंमध्ये शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांसह सुंदर नृत्य करताना दिसतात, तर कधी कविता म्हणताना दिसतात. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील मुलं प्राण्यांचे विविध आवाज काढताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शाळेतील काही विद्यार्थी म्हैस, घोडा, कुत्रा, बकरी या प्राण्यांचे हुबेहूब आवाज काढताना दिसत आहेत. यावेळी त्यांचे हे सादरीकरण पाहून इतर विद्यार्थी मोठमोठ्याने हसत आहेत. विद्यार्थ्यांमधील ही कला पाहून अनेक जण त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @lahuborate या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत ४० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

हेही वाचा: ‘शेवटी कर्माचे फळ मिळतेच…’ श्वानाला स्टेजवरून फरपटत नेणाऱ्या व्यक्तीबरोबर झालं असं काही…; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कर्म चांगले ठेव..”

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “शाळेला झू करून टाकला गुरुजींनी, पण लेकरं आनंदाने शिकतायत”; तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “शिकवण्याची व शिकण्याची नवीन दिशा.. जी बदलेल नवीन पिढीची दशा”, तर इतर युजर्स शिक्षकांचे कौतुक करत आहेत.