Viral Video: जंगलातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात, ज्यात काही प्राण्यांचेही व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात, तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक वाघ, मगरीवर हल्ला करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

हिंस्र प्राण्यांसाठी ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो त्यालाही आपला जीव वाचावा असं वाटतं, त्यामुळे तोदेखील जीवाच्या आकांताने शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते, तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक वाघ तळ्यातील मगरीची शिकार करण्यासाठी गेल्याचे दिसत आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
uran panje flamingos
Uran Flamingos : उरणच्या पाणजे पाणथळीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन

हा व्हायरल व्हिडीओ जंगलातील तळ्याकाठचा असून तळ्याच्या किनाऱ्यावर मगर असल्याचे दिसताच वाघ तिची शिकार करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचतो. पण, यावेळी वाघाची चाहूल लागताच मगर पटकन तळ्यामध्ये जाते. शिकार हातातून निसटल्याचे दिसताच वाघ चवताळतो. मगरीच्या तत्परतेमुळे तिचा जीव वाचतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: “क्या बाप बनेगा रे तू…” मुलगा झोपू देत नाही म्हणून त्याला बांधून ठेवलं; VIDEO पाहून माराल कपाळावर हात

पाहा व्हिडीओ:

व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @Safari_with_Ghani या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर ९० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘तो भुकेला होता’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘खूपच थरारक’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘काहीही झालं तरी तो जंगलाचा राजा आहे.’ तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘वाघाचं दुसरं नाव मरण आहे.’

Story img Loader