Leopard Viral Video: या जगात अशी एकही व्यक्ती नसेल की, जिचा एकही मित्र नाही. मैत्री हे एक असे नाते आहे, जे रक्ताचे नाते नसले तरी त्यात प्रेम आणि आपुलकी असते. अनेकदा मैत्रीचे नाते रक्ताच्या नात्यांपेक्षा खूप घट्ट असते. मग ती मैत्री माणसांची असो किंवा प्राण्यांची; या नात्यामध्ये नेहमीच आपलेपणा पाहायला मिळतो. सध्या असाच एक सुंदर व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात चक्क एक बिबट्या आणि हरणाच्या पिल्लाची मैत्री पाहायला मिळत आहे. आजवर असा व्हिडीओ तुम्ही कधीही पाहिला नसेल.

सोशल मीडियामुळे सतत नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात; ज्यामध्ये अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. त्यामध्ये कधी वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. तर, काही प्राण्यांमध्ये भांडण वा मैत्री पाहायला मिळते. प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हालादेखील आश्चर्य वाटेल.

Massive tree falls in Ubud Monkey Forest in Bali kills two tourists tragic incident caught on camera
Bali: जंगलात फिरत होते पर्यटक, अचानक कोसळले भले मोठे वृक्ष; दोन पर्यटकांनी गमावला जीव, थरारक Video Viral
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
AI camera alerts authorities to halt train near Odisha elephant herd averting major accident video viral
अचानक रुळावर आला हत्तींचा कळप अन्….; पुढे जे घडले ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, Video Viral

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घनदाट जंगलामध्ये एक बिबट्या आणि हरणाचे पिल्लू एकमेकांसमोर उभे असून, यावेळी बिबट्या हरणाच्या पिल्लाला कुरवाळताना दिसत आहे. यावेळी अचानक तिथे तरस प्राणी येतो, तरसाला पाहून हरणाच्या पिल्लाचे रक्षण करण्यासाठी बिबट्या त्याला आपल्या जबड्यात पकडून झाडावर घेऊन जातो. बिबट्याच्या या कृतीनं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे; तर काही जणांनी बिबट्याच्या या कृतीला त्याची ही शिकार करण्याची पद्धत असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा: ‘डान्स असावा तर असा…’; ‘चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी’ गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kedilervadisi या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि ९० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर एका युजरने लिहिलंय, “ते पिल्लू खूप निरागस आहे.” दुसऱ्यानं लिहिलंय, “खूप छान व्हिडीओ.” तिसऱ्या व्यक्तीनं लिहिलंय, “चांगले मित्र.”

Story img Loader