Viral Video: जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू निश्चित असतो. तो केव्हा, कुठे, कोणत्या क्षणी येईल हे सांगता येत नाही. मनुष्यांप्रमाणेच प्राण्यांनाही त्यांच्या मृत्यूची भीती असते. त्यामुळे ते स्वतःची शिकार होण्यापासून वाचण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करताना दिसतात. वेळप्रसंगी ते शक्तीपेक्षा युक्तीचाही वापर करतात आणि कित्येकदा त्यात यशस्वी होतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एका लांडग्याने युक्तीचा वापर करून स्वतःचा जीव वाचवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जंगलातील काही प्राणी खूप हुशार असतात. ज्या प्रकारे हिंस्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करण्यात पारंगत असतात. त्याचप्रमाणे इतर प्राणीदेखील आपल्या युक्तीचा वापर करून आपला जीव वाचवतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येही असेच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून, या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लांडगा जमिनीवर पडला असून, त्यावेळी एक श्वान तिथे येतो आणि लांडग्याचा मृत्यू झाला आहे, असं समजून त्याला खाण्याचा प्रयत्न करतो. श्वान लांडग्याचे लचके तोडण्यासाठी त्याला मोकळ्या जागेत घेऊन येतो. तेवढ्यात लांडगा उंच उडी मारून तिथून पळ काढतो. लांडग्याचा हा चतुरपणा पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

हेही वाचा: ‘शक्ती आणि युक्तीचा अनोखा खेळ…’ भुकेलेल्या वाघांसमोर माकडानं केलं असं काही…; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल शॉक

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @upsc_a_s या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत जवळपास आठ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि तीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “तो मृत्यूच्या दारातून परत आला.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “अरे व्वा! कुत्र्याचा हिरमोड झाला.” तिसऱ्याने लिहिलेय, “हा किती हुशार आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video the wolf managed to escape from the dogs clutches video goes viral on social media sap