Video Viral : बाप हा बाप असतो. आईचे गोडवे आपण अनेकदा ऐकतो पण वडिलांविषयी फारसे बोलले जात नाही. वडिलांची माया ही जगावेगळी असते. परिस्थिती कशीही असो मुलांसाठी झटतो तो बाप असतो. वडिल मुलांच्या नात्यातील गोडवा जपणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक असाच व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. थोडं खरचटलं तर आपण आई गं असं म्हणतो तेच एखाद्या मोठ्या संकटात आपल्या तोंडातून बापरे असेच उच्चार निघतात. परिस्थिती कोणतीही असूदेत वडिलांचं छप्पर असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येते. एका दोन वर्षाच्या मुलावर लांडग्यानं हल्ला केल्यानंतर वडिलांनी त्याला कसं वाचवलं याचा थरार या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. काही व्हिडिओ कॉमेडी असतात तर काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात. हल्ली तर अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती घरासमोर पार्क केलेल्या कारमध्ये काहीतरी काम करत आहे. तिथेच बाजूला एक लहान बाळ उभं असलेलं व्हिडीओमध्ये दिसत आहे. घराबाहेर एकदम शांत वातावरण दिसत आहे. त्याचवेळी अचानक एक लांडगा त्याठिकाणी येतो आणि आजूबाजूचा अंदाज घेत लहान बाळावर हल्ला करतो. या हल्ल्यात लहान बाळ खाली पडतं, आणि लांडगा त्याला फरफटत घेऊन जाऊ लागतो. यावेळी बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून व्यक्ती बाहेर येतो आणि लांडग्याच्या तावडीतून बाळाला आपल्याकडे घेतो. त्यानंतरही हा लांडगा व्यक्तीच्या दिशेने येताना दिसत आहे. यावेळी चिमुकल्याच्या वडिलांनी दगड मारुन लांडग्याला पळवून लावलं.

वडिलांनी जर वेळीच बाळाला वाचवलं नसतं तर लांडग्यानं बाळाला जखमी केलं असतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मृत्यू जवळ आला पण चमत्कार झाला; दैव बलवत्तर म्हणून ‘तो’ असा वाचला, पाहा थरारक VIDEO

हा व्हिडीओ सोशल मीडियावर @crazyclipsonly या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. नोटकरी या व्हिडीओवर कमेंट करत वडिलांचं कौतुक करत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video the wolf was hunting a 2 year old girl the father will be shocked to see what he did next srk