Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच काही ना काहीतरी व्हायरल होतच असतं. अनेकदा त्यावर अपघाताचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. जे समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. नुकताच असाच एक थरकाप उडविणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एक महिलेनं चक्क हत्तीला धडक मारल्याचं दिसत आहे.
अनेकदा सोशल मीडियावर प्राण्यांच्या अपघाताचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यात कधी गाडीमुळे कुत्र्याचा अपघात होताना दिसतो; तर कधी मांजर, म्हैस यांसारख्या प्राण्यांचा अपघात होताना दिसतो. अशा व्हिडीओंवर मोठ्या प्रमाणात तीव्र संतापदेखील व्यक्त केला जातो.
नुकताच समोर आलेला हा व्हिडीओ इन्स्टग्रामवरील @its__jeetu_goswami या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मोठ्या रस्त्यावरून एक महिला स्कुटी चालवत आहे. त्यावेळी एक हत्तीदेखील रस्ता ओलांडत असतो. यावेळी हत्तीला अचानक पाहून महिला दचकते आणि त्यालाच जोरात धडक मारून पुढे निघून जाते. त्यावेळी हत्तीदेखील स्वतःचा जीव मुठीत घेऊन रस्त्याच्या बाजूला पळून जातो.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर आतापर्यंत ६३ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि एक मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्सही करताना दिसत आहेत. त्याबाबत एकानं लिहिलंय, “हत्तीलाही माहीत आहे की, पप्पांच्या परीचा काही भरोसा नाही.” तर दुसऱ्यानं लिहिलंय, “नशीब हत्ती तिच्या गाडीखाली नाही आला.” तर तिसऱ्या एका युजरनं लिहिलंय, “हत्तीनं जीव वाचल्यानंतर देवाचे आभार मानले.” तर आणखी एका व्यक्तीनं लिहिलंय, “ती महिला होती म्हणून. जर एखादा पुरुष असता, तर हत्तीनंआपल्याला मारलं असतं.”
दरम्यान, यापूर्वीदेखील प्राण्यांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये एक हत्ती चक्क एका गाडीवर बसून प्रवास करीत होता.