Viral Video: आई ही आईच असते, मग ती मनुष्य असो किंवा प्राणी. एखाद्या गरजूला मदत करण्यासाठी ती कधीही मागे-पुढे पाहत नाही. आजपर्यंत आईचं तिच्या मुलांवरील प्रेम दाखवणारे तुम्ही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील, ज्यात तिच्या लेकारांव्यतिरिक्त कधी मांजर, कुत्रा किंवा माकड अशा विविध प्राण्यांना ती जीव लावताना दिसली असेल. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एक महिला माकडाच्या पिल्लाची मदत करताना दिसतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राणीदेखील मनुष्यांप्रमाणेच हुशार असतात. त्यांनाही माणसांप्रमाणे भावना असतात आणि त्यामुळे त्यांना जर कोणी विनाकारण त्रास देत असल्यास ते त्यावर लगेच प्रतिकार करतात. तसेच जर कोणी त्यांना जीव लावत असेल, तर तेदेखील त्या व्यक्तींवर हक्क दाखवतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीसं पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका बसस्थानकावर शाळेचे काही विद्यार्थी उभे असून यावेळी तिथे माकडाचे पिल्लू येते आणि एका विद्यार्थ्याच्या बॅगेला लावलेली बाटली काढण्याचा प्रयत्न करते. माकडाच्या हालचालीवरून नक्कीच त्याला पाणी प्यायला हवं असणार असा अंदाज एक महिला लावते आणि ती पाण्याची बाटली काढून माकडाच्या पिल्लाला पाणी पाजते. तहानलेले पिल्लू पोटभर पाणी पितो आणि पळून जातो. यावेळी महिलेने स्वतःच्या मुलाप्रमाणे पिल्लावर केलेली माया पाहून नेटकरीही कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @universe_marathi या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर तीस हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने या व्हिडीओवर लिहिलेय, “आईचे पाण्याचे कर्ज एक ना एक दिवस नक्की फेडणार तो”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “आई ही आईच असते”, तिसऱ्या युजरने लिहिलेय, “एवढ्या लोकांमध्ये त्या मातेलाच कळलं काय पाहिजे त्या वानराला”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “आईची जागा जगात कोणीच नाही घेऊ शकत”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “ही असते आईची माया.”