Viral Video: आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक चहाप्रेमी पाहायला मिळतात. पण, या चहाप्रेमी त्यांचे चहावरील प्रेम फक्त चहा पिण्यापुरते मर्यादित ठेवत नाहीत. तर, ते हातावर टॅटू काढणे ते अगदी कानातले किंवा बाईकचे कप-बशीचे कीचेन (keychain) बनवून घेणे अशा विविध प्रकारे व्यक्त करीत असतात. अनेकांना चहाची तलफ येते त्या वेळेला किंवा नेहमीच्या ठरलेल्या वेळेला चहा प्यायल्याशिवाय राहवत नाही. पण, अशा वेळी हे चहाप्रेमी चहासाठी केवढी हद्द पार करू शकतात याचा अंदाज तुम्हाला लावू शकता का? नाही… तर आज एका कामगाराने तारेवरची कसरत करून स्वतःची चहा पिण्याची इच्छा पूर्ण केली आहे.
एका ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरू होते. तेव्हा एका चहाप्रेमी कामगाराला चहा पिण्याची अनिवार इच्छा होते. तेव्हा दुसरा कामगार शक्कल लढवतो. चहाविक्रेत्याकडून गरमागरम चहा बनवून आणलेला असतो. पण, ज्या कामगाराला चहा पिण्याची तीव्र इच्छा असते तो थोड्या उंचीवर काम करीत बसलेला असतो. तर दुसरा कामगार काठीच्या टोकावर चहाचा कप अलगद ठेवून हळूहळू थोड्या उंचीवर बसलेल्या कामगारापर्यंत पोहोचवतो. चहाप्रेमीपर्यंत हा कपभर चहा नक्की पोहोचतो का ते एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.
हेही वाचा…VIDEO: नियंत्रण सुटले अन् सुसाट कारची तरुणाला धडक; पुढे जे घडलं ते पाहून म्हणाल, दैव बलवत्तर!
व्हिडीओ नक्की बघा…
आपण कितीही कामात असलो तरीही घोटभर चहा थोडा ताण कमी करण्यास अथवा थोडी ऊर्जा देण्यास नेहमी मदत करतो. त्यातच अनेक चहाप्रेमींना त्यांच्या वेळेत चहा पिण्याची दररोज सवय असते. बहुधा म्हणूनच कामगारालासुद्धा त्याच्या चहाच्या वेळेत चहा हवा होता आणि तो देण्यासाठी दुसऱ्या कामगाराने शक्कल लढवली आहे. व्हायरल व्हिडीओतून तुम्ही पाहिले असेल की, जवळपास कोणतीही शिडी नसल्यामुळे दुसऱ्या कामगाराने चहाचा कप काठीच्या टोकावर अलगद ठेवून चहाप्रेमी कामगारापर्यंत पोहोचवला आणि मग तो कामगार त्या चहाचा आस्वाद घेताना दिसला.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Gulzar_sahab या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला ‘काहीही झाले तरी चहाची पिण्याची वेळ चुकली नाही पाहिजे’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून येत आहेत. त्यातील काही युजर्स पोट धरून हसत आहेत. तर काही जण ‘चहा म्हणजे प्रेम’, असेसुद्धा सांगताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.