Viral Video: सोशल मीडियावर लोक कधी कुठल्या गोष्टी शेअर करतील हे सांगता येत नाही. सोशल मीडियामुळे आपल्याला जगभरातील अनेक गोष्टी पाहायला मिळतात. दिवभरात असे नवनवीन लाखो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. त्यात अगदी गाणी, डान्स अशा व्हिडीओंपासून पक्षी, प्राणी यांचेदेखील अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा सोशल मीडियावर भटक्या कुत्र्यांचे व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आपण पाहतो. या व्हिडीओंमध्ये अनेकदा कुत्र्याला काही लोक अमानुष मारहाण करताना दिसतात; तर काही व्हिडीओंमध्ये कुत्रा व्यक्तीवर हल्ला करताना दिसतो. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

कुत्र्याला सर्व प्राण्यांमध्ये खूप प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखलं जातं. पाळीव कुत्रा घराची राखण करतो, घरात एखादा अनोळखी व्यक्ती येताना दिसली की, तो तिच्यावर भुंकून आपला विरोध प्रदर्शित करतो. रस्त्यावरील भटके कुत्रेही परिसराची राखण करताना दिसतात. म्हणजे ते वावरत असलेल्या एखाद्या परिसरात अनोळखी व्यक्ती आलेली दिसली की, तेही त्या व्यक्तीवर भुंकू लागतात. हे आपल्या सर्वांसोबतदेखील बऱ्याचदा घडतं. नुकत्याच व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येदेखील मध्यरात्री बाईकवरून जाणाऱ्या तरुणावर चार-पाच कुत्री भुंकायला सुरुवात करतात. पण, तेवढ्यात तो तरुण अशी काही शक्कल लढवतो की, जी पाहून तुम्हालाही हसू येईल.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मध्यरात्री एका रस्त्यावरून तरुण बाईकवरून जात असताना अचानक रस्त्याच्या कडेला उभी असलेली चार-पाच कुत्री त्यांच्यावर भुंकतात, त्यावेळी तो त्यांना, “मी लोकल आहे भावा लोकल, इथलाच आहे”, असं म्हणतो. त्यावेळी तरुणाचा आवाज ऐकून कुत्री लगेच शांत होतात. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील पोट धरून हसाल.

हेही वाचा: असला नवरा नको रे बाबा! भरलग्नात नवरदेवाने मित्राला मारली लाथ, वधू घाबरली; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “अरे हा वेडा…”

पाहा व्हिडीओ:

या व्हायरल व्हिडीओ X(ट्विटर) वरील @Professor of memes या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आिहे. त्यावर आतापर्यंत आठ लाखांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट करतानादेखील दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “बरं झालं यानं सांगितलं नाही तर.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “हो तू, खरंच लोकल आहेस.” तर तिसऱ्या युजरने लिहिलेय, “स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी”, तर आणखी एकाने लिहिलेय, “एकदम मस्त आयडिया.”

दरम्यान, यापूर्वीही कुत्र्यांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात एका भटक्या कुत्र्याने महिलेवर भयानक हल्ला केला होता. या दुर्घटनेत ती महिला गंभीर जखमी झाली होती.

Story img Loader