Viral Video: आपण अनेकदा सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ पाहतो. त्यातील काही व्हिडीओ प्राण्यांचे असतात, ज्यातील काही घटना मजेशीर तर काही व्हिडीओ असे असतात जे पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. असे व्हिडीओ सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज किंवा लाइक्स मिळवतात. सध्या असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचादेखील थरकाप उडेल.

बैल हा एक असा प्राणी आहे की, जो एकदा खवळला की काहीही करू शकतो. अशा वेळी त्याला नियंत्रणात ठेवणंदेखील खूप कठीण असतं. सोशल मीडियावर बैलाचे असे अनेक थरारक व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक उधळलेला बैल एका व्यक्तीवर हल्ला करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका मैदानामध्ये अनेक पुरुष हातात लाल कपडा घेऊन उभे असून यावेळी तिथे एका बैलालाही उभं करण्यात आलं आहे. यावेळी बैलाला लाल रंगाचा कपडा दाखवून भडकवलं जात आहे. खरं तर हा एक खेळ असून अनेक देशांमध्ये तो खेळला जातो. पण, या खेळात अनेकांना आपल्या जीवाची बाजी लावावी लागते. या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे. लाल रंगाचा कपडा पाहून चिडलेला बैल एका व्यक्तीला शिंगावर उचलून खाली पाडतो, त्यानंतर पुन्हा तीन-चार वेळा बैल त्याला उचलतो आणि जमिनीवर आपटतो.

हेही वाचा: VIDEO: “कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, तरस प्राण्याच्या समूहाने सिंहाला डिवचलं; पुढे जे घडलं ते पाहून बसेल धक्का

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ X (ट्विटर) वरील @Viral Content या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याशिवाय या व्हिडीओला आतापर्यंत अनेक व्ह्यूज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक जण कमेंट्स करतानाही दिसत आहेत. एकानं लिहिलंय की, “बापरे, खूपच भयानक आहे ही घटना.” दुसऱ्याने लिहिलंय की, “कशाला नको ते खेळ खेळायचे”, तर आणखी एकानं लिहिलंय, “भयानक प्रकार आहे हा.” दरम्यान, मागील काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील अशाच एका बैलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने अनेकांवर हल्ला केल्याचं दिसलं होतं.