Viral Video: प्रत्येक लेकरासाठी त्याच्या बालपणी त्याचे आई-वडील जितके महत्त्वाचे असतात, तितकेच त्याच आई-वडिलांसाठी त्यांच्या म्हातारपणी मुलं महत्त्वाची असतात. आई नऊ महिने कळा सोसून आपल्या मुलांना जन्म देते, हे सुंदर जग दाखवते; तर वडील आयुष्यभर कष्ट करून मुलांना लहानाचं मोठं करतात, लहानपणापासून त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. आपण जे दु:ख भोगलं, ते मुलांच्या नशिबी येऊ नये म्हणून त्यांना हवं तसं शिक्षण देतात. परंतु, एकदा मुलं मोठी झाली की, त्यांना आई-वडील नकोसे वाटू लागतात. आपल्या सुखी आयुष्यात आई-वडिलांच्या गरजा, आजारपणं भागवणं त्यांच्या बजेटमध्ये बसत नाही.
परदेशांत गेलेली अनेक मुलं तर वृद्ध आई-वडिलांना इकडे सांभाळणार कोण? म्हणून त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात; तर काही जण आई-वडिलांना वृद्धाश्रमात न पाठवता, त्यांच्याच घरात राहून त्यांना नरकयातना देतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगा त्याच्या वृद्ध आईला स्वतःच उचलून जंगलामध्ये घेऊन जातो आणि तिथल्या एका खोल खड्ड्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याची आई खड्ड्यामध्ये जायला नकार देते आणि त्यामुळे तो तिचे दोन्ही पाय हातात पकडून तिला खड्ड्यात फेकण्याचा प्रयत्न करतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, नेटकरीही यावर संताप व्यक्त करीत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @agricalture_wishw या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यावर हजारो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “बापरे! इतकं भयंकर… याला तर जिवंत जाळायला हवा”. दुसऱ्याने लिहिलेय, “काय उपयोग अशा मुलाचा”. तिसऱ्या युजरने लिहिलेय, “त्या आईने यासाठीच जन्म दिला होता का त्याला, बिचारी”. आणखी एकाने लिहिलेय, “देवपण माफ नाही करणार याला”.