Viral Video: समाज माध्यमांवर व्हायरल झालेले विविध व्हिडीओ आपण नेहमीच पाहतो, ज्यावर लोक बऱ्याचदा त्यांच्या पाळीव प्राण्यांबरोबरचे विविध व्हिडीओदेखील शेअर करीत असतात. या व्हिडीओंमध्ये काही लोक आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांबरोबर नाचताना दिसतात तर कधी खेळताना, मजामस्ती, तर कधी भांडण करतानाही दिसतात. पण, तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला वाघ, सिंह किंवा बिबट्या अशा हिंस्र प्राण्यांबरोबर फोटो काढताना पाहिलंय का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक तरुण चक्क जंगालातील चित्त्याबरोबर असं काही तरी करतोय, जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाघ, सिंह किंवा चित्ता म्हटलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. आपल्या आसपासच्या परिसरात हे प्राणी फिरत असल्याची बातमी जरी कळली तरी लोक घराबाहेर पडायला घाबरतात. लोकच नाही तर जंगलातील इतर प्राणीदेखील या हिंस्र प्राण्यांपासून स्वतःचा जीव कसा वाचवता येईल यासाठी अनेक प्रयत्न करीत असतात. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण जंगलात बसून चक्क चित्त्याबरोबर फोटो काढताना दिसतोय, जे पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण त्याच्या मित्रांसह जंगलात फिरत असताना त्यांना चित्ता दिसतो. यावेळी त्यातील एक जण चित्त्याच्या बाजूला बसून फोटो काढण्याचे धाडस करतो. पण, यावेळी फोटो काढताना त्याला दरदरून घाम फुटला होता, पण तरीही फक्त एका फोटोसाठी हिंमत करून तो तरुण चित्त्याच्या बाजूला बसून त्याच्या पाठीवरून हात फिरवतो आणि फोटो काढतो. यावेळी चित्ता त्या तरुणाकडे पाहतो, पण तोदेखील त्याला काहीच करत नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @khanvish_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत; तसेच यावर पन्नास हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: याला म्हणतात माणुसकी! नदीच्या पाण्यात अडकलेल्या हत्तीच्या पिल्लाचा वनाधिकाऱ्यांनी वाचवला जीव VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत (Viral Video Comments)

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “बाळा चित्ता आहे तो, तुला पळून पण देणार नाही”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “अरे तू किती घाबरला आहेस हे दिसतंय तुझ्या तोंडावरून”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “भावा तुला मानलं पाहिजे, फोटोसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “असे स्टंट लोक बघतात आणि तसंच करतात.”

दरम्यान, यापूर्वीदेखील एका तरुणीचा असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिने चक्क वाघाला मिठी मारली होती आणि त्याचे चुंबनदेखील घेतले होते.