Viral Video: हल्ली अनेक जण आपल्या फिटनेसची खूप काळजी घेताना दिसतात. यासाठी काही जण योगा करतात, तर काही जण जीममध्ये जातात. आजकालची तरुण मंडळी बॉडी बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात. जीममध्ये जाऊन एक्सरसाइज करणं कधीही चांगलंच, पण अशी काही मंडळी आहेत जी केवळ दुसऱ्यांना दाखवण्यासाठी या सर्व गोष्टी करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक तरुण भररस्त्यात असं काहीतरी करतोय जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
केवळ प्रसिद्धीसाठी आणि लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक मंडळी जीममध्ये जाऊन वर्कआउट करताना रिल्स बनवणे, फोटो काढणे असे नवनवीन उद्योग करत असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्येदेखील एक तरुण असाच दिखावा करताना दिसत आहे, जे पाहून एका मुलीने त्याला चांगलाच चोप दिला आहे.
हा व्हायरल व्हिडीओ X (पूर्वीचे ट्विटर) वरील @Sanju या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी एका स्टॉलवर पाणीपुरी खात आहे, त्यावेळी तिथे एक तरुण येऊन उभा राहतो आणि त्या तरुणीला स्वतःचे आर्म्स दाखवतो. सुरुवातीला ती तरुणी त्याच्याकडे दुर्लक्ष करते, पण तो पुन्हा पुन्हा स्वतःची बॉडी तिला दाखवतो. त्याचे आर्म्स पाहून ती तरुणी इप्रेंस होईल असं त्याला वाटलं. पण, इथे काहीतरी भलतच झालं, ज्याचा त्या मुलाने कधी विचारही केला नसेल. त्या मुलाची नाटकं पाहून तरुणी पाणीपुरीचे पाणी त्याच्या अंगावर फेकते आणि पुढे येऊन, “बॉडी कोणाला दाखवतोस रे”, असं म्हणत त्याच्या दोन-तीन कानाखाली मारते. त्यानंतर तो मुलगा काहीच न बोलता सरळ मान खाली घालून तिथून निघून जातो.
हेही वाचा: अरेरे! नाटकी कुत्र्यामुळे झालं ट्रॅफिक जाम; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “याला पण एक ऑस्कर द्या”
पाहा व्हिडीओ:
या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत जवळपास दोन हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर अनेक लाइक्सदेखील मिळाल्या आहेत. शिवाय अनेक जण यावर कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय की, “याचा सगळा माज उतरला”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “किती नाटकं करत होता”, याला असंच पाहिजे. तर तिसऱ्याने लिहिलंय की, “ताई उगाच चिडली”, तर आणखी एका व्यक्तीने त्या, “शाब्बास मुली, अशा मुलांना अशीच शिक्षा मिळायला हवी” म्हणत त्या मुलीचे कौतुक केले आहे. तर काही जण हा व्हिडीओ स्क्रिप्टेड असल्याचं म्हणताना दिसत आहेत.