Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा लोकांच्या हटके जुगाडचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात कधी कोण कुकरने शर्टला इस्त्री करताना दिसतो तर कधी कोण फुटलेल्या गाडीवर प्लास्टर करताना दिसतो. अतरंगी लोकांचे असे अतरंगी व्हिडीओ नेहमीच मनोरंजन म्हणून पाहिले जातात, पण काही व्हिडीओ असेदेखील असतात, ज्याचा फायदा आपल्यालाही होतो. आता असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्याचा फायदा तुम्हालादेखील नक्कीच होईल.
हल्ली अनेक तरुण मंडळी आवर्जून ट्रेकिंगला जातात, यावेळी स्वतःसोबत अनेक उपयोगी पडणाऱ्या गोष्टी ते आवर्जून घेऊन जातात. अनेकदा ते ट्रेकिंगसाठी काही हटके ट्रिकदेखील वापरतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येदेखील या तरुणीने असाच एक जुगाड केला आहे, जो पाहून तुम्हीदेखील चकित व्हाल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जंगलात गेलेली एक तरुणी तिथे राहण्यासाठी चार झाडांना प्लास्टिक गुंडाळून झोपण्यासाठी बेड बनवते. पण, इतक्यात पाऊस पडतो आणि तिने बनवलेला बेड भिजतो, त्यामुळे ती त्या बेडवर छप्पर बनवते. त्यानंतर कोणत्याही प्राण्याचा त्रास होऊ नये म्हणून ती या बेडच्या चारही बाजूला पुन्हा प्लास्टिक गुंडाळते आणि घर बनवते आणि त्यामध्ये आराम करते.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून यावर नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. यावर एकाने लिहिलंय की, “घर बनवलं ते ठीक आहे, पण जाताना सर्व प्लास्टिक घेऊन जा.” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “खूप छान आयडिया आहे ट्रेकला गेल्यावर”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “बापरे, इथे जर वाघ आला तर”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “व्वा, खरंच खूप चांगली आयडिया आहे.”
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mr_mystery_explorer या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, यावर साडे चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत; तसेच याला चौदा हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.