सोशल मीडियावर अनेक सीसीटीव्ही फुटेजचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये आपण अनेक अनपेक्षित घटना पाहतो. सध्या अशीच एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये आपण एका चोराला एक बॅग चोरून पळताना पाहू शकतो. प्रथमदर्शनी हे एक कपड्यांचे दुकान आहे असे समजते. हा चोर या दुकानामधून एक काळी बॅग घेऊन पळत आहे. मात्र पुढच्याच क्षणी तो तेथील एका काचेच्या दाराला आदळतो.

अमेरिकेमध्ये ही घटना घडली असून व्हायरल झालेला हा व्हिडीओ वॉशिंग्टनमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. येथील बेनेव्ह्यूमध्ये असलेल्या लुइ विटॉन या शोरूममधून हा चोर समान चोरून पसार होण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चोरचे वय केवळ १७ वर्षे असून त्याने या दुकानातून १८ हजार डॉलर म्हणजेच जवळपास १४ लाख रुपयांचे सामान लंपास करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्याच्या या प्रयत्नांना यश आले नाही.

fasting on Karva Chauth Read expert advice
उपवासामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते? करवा चौथचा उपवास करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
26 October Daily Horoscope IN Marathi
Daily Horoscope, 26 October : आज मेष ते…
book The only person you are destined to become is the person you decide to be
क्षमताविकासाचे सूत्र
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही: यशाकडे जाण्याची शिडी
Sedentary lifestyle leads to permanent back pain Orthopedic experts said the solution
बैठ्या जीवनशैलीमुळे जडतेय कायमची पाठदुखी! अस्थिविकारतज्ज्ञांनी सांगितले उपाय…
menopause
Menopause बाबत ‘या’ चांगल्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? तज्ज्ञांनी केला खुलासा
how much should a person both above and below 60 years old walk everyday
६० वर्षांवरील वा त्यापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीने नियमित किती चालले पाहिजे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
Katrina kaif wearing black patch arm fitness glucose levels benefits expert tips
नवरात्रीत कतरिना कैफच्या हातावर दिसला काळा पॅच, याचा कोणत्या आजाराशी आहे संबंध? तज्ज्ञांनी केला खुलासा

धक्कादायक! विद्यार्थिनीच्या प्रेमात पडलेल्या PT च्या महिला शिक्षिकेने लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करुन…

१४ लाखांचे सामान असलेली ही बॅग घेऊन पळत असताना हा चोर एक काचेच्या दारावर आदळला. यावेळी तो इतक्या जोरात आपटला की त्याला लगेचच चक्कर आली. चोराला वाटले तिथे कोणताही दरवाजा नसून सामान घेऊन पसार होण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. दरम्यान, १७ वर्षांचा हा चोर अल्पवयीन असल्याने त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, हा मुलगा रिटेल दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य असून त्याचा गुन्हेगारी इतिहास आहे.

बिबट्याच्या एका फोटोसाठी फोटोग्राफरचा बर्फातून १६५ किलोमीटर पायी प्रवास; जाणून घ्या, Viral Photo मागची गोष्ट

न्यूयॉर्क पोस्टनुसार, किरकोळ दुकानांवर दरोडा आणि चोरीच्या आरोपाखाली या वर्षी बेल्लेव्ह्यूमध्ये ५० हून अधिक गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. सुमारे ५९ जणांवर दुकानांमधून संघटित चोरीचा केल्याचा आरोप आहे.