Viral Video: आई आणि मुलाचे नाते जेवढे खास असते, तेवढेच घट्ट आणि खास नाते वडील आणि मुलाचेदेखील असते. बाप गरीब असो वा श्रीमंत, तो आपल्या मुलांना नेहमीच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. सोशल मीडियावर वडील आणि मुलाच्या नात्याचे व्हिडीओदेखील खूप व्हायरल होत असतात. ज्यात कधी ते रील्स बनवताना तर कधी डान्स, गाणी म्हणताना तसेच खेळतानादेखील दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक वडील जेवत असताना मांडीवर बसलेला लहान मुलगा असं काहीतरी करतो, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

लहान मुलं खूप गोड आणि निरागस असतात. हल्लीची मुलं खूप हुशार आहेत, त्यामुळे ते कधी काय करतील हे सांगता येत नाही. ही मुलं सोशल मीडियावरदेखील खूप अॅक्टिव्ह असतात. शिवाय या मुलांना बाहेरचे खाद्यपदार्थ खायला खूप आवडतात. पिझ्झा, बर्गर, पास्ता, मॅगी, केक असे अनेक पदार्थ लहान मुलं खाण्याचा हट्ट त्यांच्या पालकांकडे करतात. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दीड-दोन वर्षांचा लहान मुलगा असं काहीतरी करतोय जे पाहून तुम्हाला हसू येईल.

Sudesh Bhosale
सुदेश भोसलेंनी सांगितलं आशा भोसले यांच्याबरोबरचं नातं; किस्सा सांगत म्हणाले, “तेव्हापासून मी त्यांना आई…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
ring ceremony Funny Video
साखरपुड्यात नवरीला उचलताना अचानक फाटली नवरदेवाची पँट अन्… पुढे घडलं असं काही की VIDEO पाहून हसाल पोट धरून
Boy hold funny poster on valentine day funny video goes viral on social media
VIDEO “नाही माझ्याकडे पप्पाची परी म्हणून…” तरुणानं खास सिंगल लोकांसाठी लिहली पाटी; पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
valentines day chaturang article
नात्यांची नवी वळणदार वळणे
Shocking video Young Man Risks His Life By Climbing 30-Ft Hoarding On Highway For Instagram Reel In UP's Saharanpur
“हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” तरुणानं रीलसाठी अक्षरश: कळस गाठला; VIDEO पाहून थरकाप उडेल
Emotional video of father running behind train to earn money hardwork video viral
एका बापाची मजबुरी! प्लॅटफॉर्मवरून उडी मारली, ट्रेनच्या मागे धावत सुटला अन्…; ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वडील आपल्या दीड-दोन वर्षांच्या लहान मुलाला मांडीवर घेऊन बसले आहेत, यावेळी ते काहीतरी खाताना दिसत आहेत. वडील पहिला घास खाणार तेवढ्यात मांडीवर बसलेला चिमुकला त्यांच्या हातातील घास जोरात खेचतो आणि स्वतः खाण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याचे बाबा पटकन त्याच्या हातातून तो घास काढून घेतात, यावर तो मुलगा खुदकन हसतो. या आगाऊ चिमुकल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @upliftmenthub या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत एकवीस मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि चार लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत, तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट करतानादेखील दिसत आहेत.

हेही वाचा: ‘आई मला माफ कर…’ रुसलेल्या मालकिणीला पाहून श्वानाला आलं रडू; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “आईचा रुसवा म्हणजे…”

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत (Viral Video Comments)

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “मी कोणाशीही वाद घालणार नाही, पण जगातील सर्वात वेगवान हात लहान मुलांचे आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “त्याने एवढ्या जोरात कसे पकडले”, तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “शेवटी बाळाचे हसू आणि तो त्याच्या कृत्यामुळे खूप आनंदी दिसतोय”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “बाळाला मोठ्यांचा खाऊ खायचाय.”

Story img Loader